शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘संतोष माने’

By admin | Updated: June 16, 2016 04:02 IST

एसटी पळवून नेऊन अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला संतोष माने याची आठवण व्हावी, अशी घटना बुधवारी सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर नागरिकांनी अनुभवली़ एका ट्रकने पार्क

पुणे : एसटी पळवून नेऊन अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला संतोष माने याची आठवण व्हावी, अशी घटना बुधवारी सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर नागरिकांनी अनुभवली़ एका ट्रकने पार्क केलेल्या मोटारीसह ५ दुचाकी वाहनांना धडक दिली़ त्यात एका तरुणीसह तिघे जखमी झाले़ याप्रकरणी ट्रकचालक व एका हमालाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे़ ट्रकचालक दत्तात्रय आनंदराव फडतरे (वय ४५, रा़ ससाणेनगर) आणि हमाल बापू राजू काळे (वय २५, रा़ गंगानगर, फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत़ या प्रकरणी श्वेता दर्शन रावल (वय ३४, रा़ बोट क्लब रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की दत्तात्रय फडतरे यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास एका टेम्पोच्या मागे ट्रक पार्क केला होता; पण किल्ली तशीच ठेवली होती़ बापू काळे याने हा ट्रक सुरू केला़ त्यात त्याचा पाय अ‍ॅक्सिलेटरवर पडला़ त्याबरोबर ट्रक वेगाने पुढे निघाला़ टेम्पोला धडक देऊन त्याने शेजारी पार्क केलेल्या २ दुचाकींना धडक दिली़ त्यात तरुणीसह तीन जण जखमी झाले़ त्यानंतर पुढे जाऊन ट्रकने आणखी ४ दुचाकींना धडक दिली़ एका मोटारीला धडक देऊन तिला तसेच रेटत ट्रक पुढे कचराकुंडीला धडकून थांबला़ या प्रकाराने घाबरलेल्या नागरिकांनी काळे याला बाहेर ओढून मारहाण केली़ ही घटना विश्रामबाग पोलिसांना समजताच ते तातडीने घटनास्थळी धावले़ त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले़ या घटनेमुळे पुणे पूर्वी शहरात खळबळ माजविणाऱ्या संतोष मानेची आठवण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले़ (प्रतिनिधी)- ट्रकच्या धडकेने टेम्पो, मोटार व ५ दुचाकी वाहनांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़