शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतरही टँँकर मिळेना

By admin | Updated: April 29, 2017 04:01 IST

वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

भोर : वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करुन दीड महिना झाल्यानंतर एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र तो सुरु करण्यात आला नाही. पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरु आहे. टँकर सुरु करा; अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणभागातील गावांत वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. १० गावे व १३ वाड्यावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यापैकी सर्वच गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती यांच्यासाठी एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा झाला मात्र टँकर पुरविण्याचे टेंडर मिळालेल्या संस्थेने अद्याप टँकर सुरु केलेला नाही. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टँॅकर मंजूर होऊनही नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाणीटंचाई असलेल्या शिरवली हि.मा. चौधरीवस्ती, मोरवाडीचे पाचलिंगे, म्हसरबुची धनगरवस्ती, भुतोंडे, डेरेची खिळदेववाडी, गृहिणी, गुढे निवंगण, पसुरेची धनगरवस्ती, जयतपाड हुंबेवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी रायरीची धारांबेवाडी, खुलशी, वरोडी खुर्द, वरोडी बुदुक, वरोडी डायमुख, शिळींब अशिंपीची उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटाकेवस्ती, डेहेणची जळकेवाडी या १० गावांनी व १३ वाडयावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत दीड महिन्यापूर्वीच सादर केले आहेत. महामार्गावरील शिंदेवाडी व ससेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.दरम्यान, शिरवली हि.मा, भुतोंडे, पातरटेकवाडी (शिरगाव), गुढे निवंगण, मानटवस्ती (दुर्गाडी), हुंबेवस्ती (जयतपाड), जळकेवाडी (डेहेण), राजीवडी, शिळींब, खिळदेवाडी (डेरे), खुलशी, धनगरवस्ती (म्हसरबु), गृहिणी या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती या गाव वाडीला एका टँकरला म्ांजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा होऊनही संस्थेच्या हालगर्जीपणामुळे अद्याप टॅकर सुरु झाला नाही. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. (वार्ताहर)