शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईपाठोपाठ पुणे ठरला राज्यामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी करणारा जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:56 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेमध्ये ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे, तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. 

ठळक मुद्देमोहिमेमध्ये ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण१२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू

पुणे : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेमध्ये ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे, तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. मुंबईपाठोपाठ पुणे राज्यामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी करणारा जिल्हा ठरला आहे. २ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीनुसार जिल्ह्यातील ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांचा मतदार यादीत समावेश झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. मतदार नोंदणीसाठी वर्षभरापासून जिल्हा निवडणूक शाखेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीनस्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांमध्ये पुणे शहरात २९ लाख १३ हजार २९८, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११ लाख ९५ हजार ३६६ मतदार झाले आहेत. त्यामध्ये आणखी ४९ हजार मतदार अर्जांची भर पडली आहे. या मतदारांची माहिती भरून झाल्यानंतर १० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामीण भागातील ३० लाख ८८ हजार ३७ मतदारांची नोंदणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया मतदारांसह १ जानेवारी २००० या दिवशी जन्म झालेल्या ‘सहस्त्रक मतदारां’ची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. 

१० जानेवारीनंतर प्रसिद्ध केली जाणारी अंतिम मतदार यादी सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तहसीलदारांच्या कार्यालयामध्येही या याद्या पाहता येऊ शकणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही या याद्या अपलोड करण्यात येतील. - मोनिका सिंह, उप जिल्हा निवडणूक अधिकारी

मतदारसंघ व मतदार
पुणे कँटोन्मेंट२,९०,२८५
हडपसर४,४५,१११
खडकवासला४,५०,१३७
कसबा पेठ२,८१,४६९
कोथरुड३,८१,४३५
वडगाव शेरी४,१९,८५६
पर्वती३,४७,२२४
शिवाजीनगर२,९७,७८१
चिंचवड४,६४,०३७
पिंपरी३,३६,५०३
भोसरी   ३,९४,८२६
टॅग्स :Puneपुणे