शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही पाण्यासाठी गावे तहानलेलीच...

By admin | Updated: May 4, 2016 04:34 IST

स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षे उलटली खरी; परंतु अजूनही पुणे जिल्ह्यातील कित्येक गावे पाण्यासाठी तहानलेलीच आहेत. शिरवली हि.मा गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा

भोर : स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षे उलटली खरी; परंतु अजूनही पुणे जिल्ह्यातील कित्येक गावे पाण्यासाठी तहानलेलीच आहेत. शिरवली हि.मा गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा योजना नसून गावात कुठेच पाणी उपलब्ध नाही. गावातील एका हातपंपावर नंबर लावून पाणी भरले जाते. दिवसभर पाणी हापसल्यावर तासाला जेमतेम चार हांडे मिळतात. बाकी सारी भिस्त टँकरच्या पाण्यावर. मात्र, अद्याप टँकरदेखील सुरू झालाच नाही केवळ हातपंपावरच अवलंबून राहावे लागते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून टँकरग्रस्त गावाचा आढावा घेतला त्या वेळी हे चित्र समोर आले असून महिलांनी आपली व्यथा मांडली. भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा-देवघर धरण भागात दर वर्षी पावसाळ्यात तीन ते सोडतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, पाणी डोंगरावरून वाहून जाते. धरणाच्या काठावरील शिरवली हि.मा गावात १५ वर्षांपासून उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली नाही. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही धरणाच्या कुशीत असणारे हे गाव पाण्यापासून मात्र वंचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रणजित शिवतरे यांनी पाणी साठवण्यास टाक्या आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. तो टँकर अधूनमधून येत असल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे येथील गृहिणी मंदा शिरवले यांनी सांगितले. गावाजवळचे ढवरे आटले असून जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटरवर असलेल्या नीरा-देवघर धरणातून डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करीत किंवा पिकअप जीपने विकत पाणी आणावे लागते. महिलांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरू आहेत. रिंगरोडला लागून असलेल्या हातपंपाला दिवसभर रांगा लागतात.धरण भागातील रिंगरोडवरील गावांची लोकसख्या कमी असल्याने पाणीपुरवठा योजना मंजूर होत नाहीत; मात्र पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, निवंगण, शिरवली हि.मा, माझेरी कुडली बुद्रुक व खुर्द या गावांची निकष बाजूला ठेवून खास बाब म्हणून एकत्रित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे प्रयत्न करीत आहेत. ते शक्य झाल्यास लोकांची पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होऊ शकेल.