लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी चेहरा अशी टीका होत असलेल्या आम आदमी पार्टीने (आप) ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली, यवतमाळ अशा ग्रामीण भागात खाते उघडले. आता याच पद्धतीने राज्यातही जोरदार राजकीय धडक मारू, असा निर्धार ‘आप’च्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रंगा राचुरे बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. शहराध्यक्ष मुकुंद किर्दत व प्रमुख पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते.
राचुरे म्हणाले की, आपच्या युवा कार्यकर्त्यांनी राज्याच्या ग्रामीण भागात सर्व अडचणींना तोंड देत काम केले. त्याचा परिणाम म्हणून आपला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले. याच पद्धतीने आता राज्यातही लोकांचा विश्वास संपादन करणार आहोत. वाढीव वीजबिलांच्या विरोधात पक्षाच्या वतीने लवकच आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे. हे वाढीव वीज जमा केले नाही म्हणून वीज तोडली तर ती आपचा कार्यकर्ता ती परत जोडून देईल. डॉ. अभिजीत मोरे, संदीप सोनवणे, श्रीकांत आचार्य, सईद अली तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.