शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर पुन्हा विजयातही नामुष्कीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:28 IST

महापालिका हद्दीबाहेर निधी देण्याचा ठराव संख्याबळाअभावी नामंजूर झाल्यामुळे पराभवाची नामुष्की चाखायला लागलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तोच ठराव शुक्रवारच्या सभेत फेरविचार प्रस्तावाद्वारे मंजूर करून घेतला खरा

पुणे : महापालिका हद्दीबाहेर निधी देण्याचा ठराव संख्याबळाअभावी नामंजूर झाल्यामुळे पराभवाची नामुष्की चाखायला लागलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तोच ठराव शुक्रवारच्या सभेत फेरविचार प्रस्तावाद्वारे मंजूर करून घेतला खरा, मात्र त्यातही त्यांना नामुष्कीच पदरी घ्यावी लागली. कारण या ठरावाला मागील सभेत विरोध करणारे मनसेचे वसंत मोरे यांनी भाजपावर टीका करीत आपली उपसूचनाच मागे घेतली.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्ता धनकवडे व नगरसेवक युवराज बेलदरे यांनी त्यांची उपसूचना कायम ठेवली. त्यामुळे या विषयावर मतदान झाले. त्यात उपसूचनेच्या बाजूने राष्ट्रवादी, तसेच काँग्रेसने मतदान केले, तर ती फेटाळण्याच्या बाजूने भाजपा, शिवसेना यांनी मतदान केले व मूळ प्रस्ताव मान्य झाला. त्यावरील चर्चेत योगेश ससाणे, युवराज बेलदरे, गफूर पठाण, प्रकाश कदम, मनीषा कदम, वसंत मोरे आदींनी सहभाग घेतला. महापालिका हद्दीबाहेरच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी व अन्य काही गावांचे सांडपाणी, मैलापाणी कात्रजच्या तलावात येते. त्यामुळे या गावांना मलवाहिन्या विकसित करण्यासाठी १० कोटी रुपये निधी देण्याचा विषय होता. हद्दीबाहेर निधी द्यायचा असेल तर त्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांची मंजूरी लागले. एकट्या भाजपाची सभागृहातील सदस्यसंख्या त्यापेक्षा जास्त आहे. तरीही त्यांना मागील वेळी या विषयावर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे फेरविचार प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र त्यासाठीची मुदत पूर्ण झालेली नाही, सदस्यांना नोटीस दिलेली नाही, फेरविचार प्रस्ताव करायचा त्यासाठी असल्यास कायद्याने करायच्या तरतुदी पाळलेल्या नाहीत, असे बरेच मुद्दे भय्या जाधव यांनी उपस्थित केले. नगरसचिव पारखी यांनी त्यांना उत्तरे दिली. फेरविचार बेकायदा पद्धतीने आणला आहे, असे जाधव यांचे म्हणणे होते. मात्र पारखी यांनी ते अमान्य केले. दरम्यान, वसंत मोरे यांनी हद्दीबाहेर निधी दिला जातो, पण हद्दीतल्या योजना पैशांअभावी बंद केल्या जात आहेत, १५ वर्षे काम करणाºया महिलांना कामावरून काढले जात आहे, अशी टीका केली. योगेश ससाणे यांनी मांजरी शेवाळे या गावांनाही त्यांच्या याच कामासाठी निधी द्यावा, त्यांच्या सांडपाण्याचा हडपसरला त्रास होतो आहे, अशी मागणी केली. मनीषा कदम, प्रकाश कदम यांनी या प्रस्तावाच्या बाजूने भाषण केले. मोरे यांनी त्या १० कोटी मधून १ कोटी रुपये कात्रज तलाव विकसनाकरिता द्यावेत, अशी उपसूचना केली, तर राष्ट्रवादीने हद्दीबाहेरच्या गावांसाठी या पद्धतीचे धोरण कायम स्वीकारावे, अशी उपसूचना केली.सभागृहनेते उपसूचना स्वीकारण्याच्या मन:स्थितीत होते, मात्र भाजपाच्या अन्य सदस्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा ठराव मतदानाला टाकण्यात आला. मतदानाला ठराव टाकला असतानाच मोरे यांनी भाजपाच्या सदस्यांनी आपल्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, असे सांगितले.कात्रज तलाव आपल्या प्रभागात येत नाही, तरीही आपण त्याच्या विकसनासाठी १ कोटी ठेवा असे सांगत आहे ते तिथे तलाव चांगला व्हावा, यासाठीच भाजपाला तसे वाटत नसेल तर आपण आपली उपसूचना मागे घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. बेलदरे व धनकवडे यांनी मात्र उपसूचना कायम ठेवली. मतदान होऊन ती फेटाळली गेली व निधी देण्याचा मूळ प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मोरे यांनी आपली उपसूचना मागे घेत भाजपावरच कात्रज तलावाच्या विकासनाला त्यांचा विरोध असल्याचा ठपका ठेवला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका