शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही डॉक्टरांची करावी लागली प्रतीक्षा

By admin | Updated: December 22, 2015 23:57 IST

शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) मृतदेह आणला. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तब्बल सहा तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले

पिंपरी : शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) मृतदेह आणला. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तब्बल सहा तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी घडली.थेरगाव येथील विशाल सुरेश मोहिते (रा. थेरगाव) या तरुणाने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. पोलिसांनी विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात सकाळी साडेनऊच्या सुमारास आणला. त्या वेळी रात्रपाळीचे डॉक्टर निघून गेले होते, तर दिवस पाळीला असणाऱ्या डॉक्टरांची पोलीस व नातेवाईक वाट पाहत बसले होते. दिवस पाळीला डॉक्टर कोण आहेत, ते केव्हा येतील, या विषयी नातेवाईक शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करीत होते. दोन तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शवविच्छेदन गृहात एकही डॉक्टर हजर न झाल्यामुळे काही नातवाईक रुग्णालयातील इतर विभागांकडे चौकशीसाठी गेले. तेथे त्यांना डॉक्टर निघाले आहेत. थोड्या वेळात येतीलच, असे सांगण्यात आले. मात्र, दुपारी १पर्यंत एकही डॉक्टर न आल्याने नातेवाइकांचा राग अनावर झाला. त्यांनी पुन्हा रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टर व लिपिक यांना जाब विचारला. या वेळी त्यांना ‘काही डॉक्टर रजेवर असून, आज फक्त एकच डॉक्टर येणार आहेत. ते देखील तपासणीसाठी ससून रुग्णालयात गेले असून, ते आल्यावरच विच्छेदन करण्यात येईल’ असे सांगितले. काही नातेवाइकांनी या डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांचा फोन बंद होता. या प्रकारामुळे नातेवाईक अधिकच संतप्त झाले. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्या वेळी तेथील पोलीस संतप्त नातेवाइकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. वायसीएमच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. तो कारभार सुधारावा अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)