शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शर्तभंग केल्याने जागा सरकारजमा

By admin | Updated: June 24, 2017 06:09 IST

हवेली तालुक्यातील वारजे येथील सर्व्हे नंबर ३५ मधील तब्बल १ हेक्टर ७६ आर जमीन भटक्या विमुक्तांच्या

सुषमा नेहरकर-शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हवेली तालुक्यातील वारजे येथील सर्व्हे नंबर ३५ मधील तब्बल १ हेक्टर ७६ आर जमीन भटक्या विमुक्तांच्या ‘रामनगर सहकारी गृहरचना संस्थे’ला विनामूल्य कब्जेहक्काने सन २००९मध्ये देण्यात आली होती. परंतु संस्थेने विनापरवाना विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्रक करून सदनिकांचे परस्पर हस्तांतरण केल्याचे निदर्शनास आले आहे. मूळ २१८पैकी एका मंजूर सभासदाला सदनिका न देता अन्य तब्बल ३९६ लोकांना सदनिकांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासामध्ये स्पष्ट झाली. यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संस्थेने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याने सर्व जमीन त्वरित सरकारजमा करण्याचे आदेश दिले आहेत. सन २०१३मध्ये हा परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर या जागेपैकी सुमारे २६२३.२८ चौरस मीटर क्षेत्र विविध सुविधांसाठी महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिल्लक जागेमध्ये तीन इमारतींचे बांधकाम करून तब्बल ३९६ सदनिकांचे वेगवेगळ्या लोकांना वाटप करण्यात आले. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. जमीन मंजुरी देताना २१८ सभासदांची यादी निश्चित केली होती. परंतु या प्रकरणात सभासद निवडीचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असताना नवीन ३९६ सभासदांना सदनिकांचे वाटप करताना कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नाही. संस्थेने विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्र करून जमिनीचे परस्पर हस्तांतरण केले. नवीन ३९६ सभासदांना सदनिकांचे वाटप करून अ‍ॅग्रीमेंट करण्यात आले यासाठीदेखील कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्वत: संस्थेच्या अध्यक्षांनीच लेखी म्हणण्याद्वारे स्पष्ट केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संस्थेने अनेक बोगस कामे केली असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. यामुळे सौरभ राव यांनी संस्थेला दिलेली सर्व जमीन त्वरित सरकारजमा करण्याचे आदेश दिले.