निरगुडसर : नागापूर प्राथमिक शाळेत झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार तसेच शाळासुधार निधीत झालेल्या अपहाराची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन शालेय दप्तरी रजिस्टरची तपासणी केली़ त्यात दोषी आढळून आलेल्या शिक्षकांवर व मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्यासंर्दभात जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर शाळेला ठोकलेले टाळे ग्रामस्थांनी काढले़नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत़ मागील काही दिवसांपासून शाळेत गैरकारभार सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती़ परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने पाच दिवसांपूर्वी शाळेच्या कारभाराला कंटाळून पालकांनीच आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले होते़ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशीचे आश्वासन दिले़ परंतु शिक्षण विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनीच शाळेला टाळे ठोकले होते़त्यानंतर आंबेगाव पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधीक्षक पवार व विस्तार अधिकारी अभंग यांनी सविस्तर चौकशी केली़ त्यातून काही गंभीर बाबी समोर आल्याने संबंधितांवर व मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी महाजन यांनी ग्रामस्थांच्या शालेल्या बैठकीत सांगितले़ तसेच ही शाळा मी स्वत: दत्तक घेत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जादा तास घेण्यात येणार आहेत. या वेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद पवार, गणेश यादव, डॉ़ संजय भोर, भरत म्हस्के, सुनील शिंदे, प्रकाश पवार, कैलास पवार, विजय पोहकर, गणेश पवार, विलास धनगरमाळी, कैलास धनगरमाळी, सचिन इचके, रघुनाथ पवार, शांताराम मधे, गणेश मंचरे, ज्ञानेश्वर यादव व ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)
आश्वासनानंतर ग्रामस्थांनी काढले टाळे
By admin | Updated: March 23, 2017 04:06 IST