शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आंदोलनानंतर महावितरणला जाग

By admin | Updated: December 8, 2015 00:05 IST

पेरणे गावात अखंड विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी शांततामय व सांप्रदायी मार्गाने आंदोलन करून वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते.

लोणीकंद : पेरणे गावात अखंड विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी शांततामय व सांप्रदायी मार्गाने आंदोलन करून वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते. या आंदोलनाने विद्युत मंडळाचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे तातडीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या ग्रामस्थ व वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन महिन्यांत २४ तास विद्युत पुरवठा करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पेरणे गावालगत वीज मंडळाचे ४००/ के.व्ही. क्षमतेचे पॉवर हाऊस आहे. तरीही गावात बारा तास भारनियमन होते. त्यामुळे परिसरातील शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. त्यामळे २४ तास विद्युत पुरवठ्याकरिता ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. कार्यालयास कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले होते. याबाबत ‘लोेकमत’ने आवाज उठवला होता. त्यामुळे वीज मंडळ खडबडून जागे झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पुढाकाराने तातडीची बैठक घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी केलेली रास्त मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. प्रदीप कंद, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार तसेच या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मंडळाच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीमध्ये आंदोलनकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामान्य नागरिक अशी सर्वांची लक्षणीय उपस्थिती होती. वीज मंडळाकडून दोन दिवसांत लेखी पत्रही देण्यात येणार आहे. (वार्ताहर)अडचणी आहेत म्हणून आपण एकत्र येतो, पण त्या सोडविण्यासाठी वेळही दिला पाहिजे. गावातील विविध प्रश्नांसाठी मी गावाच्या बाजूने असेन.- प्रदीप कंद, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदडिंग्रजवाडी येथून स्वतंत्र लाईन टाकून पेरणे गावठाणात स्वतंत्र फिडर बसवणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.- राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता, विद्यूत मंडळ