शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २० वर्षांनंतर समाविष्ट गावांचा निर्णय

By admin | Updated: May 4, 2017 03:07 IST

महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा प्रश्न तसा २० वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. सर्वप्रथम १९९७ मध्ये युती शासनाच्या

पुणे : महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा प्रश्न तसा २० वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. सर्वप्रथम १९९७ मध्ये युती शासनाच्या काळात महापालिकेची हद्दवाढ झाली होती. नंतर त्यातील काही गावे वगळण्यात आली. त्यानंतर हद्दीलगतच्या ३४ गावांतील प्रश्न मूलभूत सुविधांअभावी जटिल बनत गेले आणि ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली. महापालिका हद्दीलगतच्या सूस, धायरी, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, आंबेगाव, नऱ्हे ही गावे हवेली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. शहराजवळ असल्याने व तुलनेने सदनिकांचे दर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. बेकायदा बांधकामे, अपुऱ्या नागरी सुविधा असल्या, तरी नागरिक गैरसोयी सोसून या भागात राहत आहेत.हवेली तालुका नागरी कृती समितीने या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने केली. या सर्वपक्षीय मोहिमेची दखलही शासनाला घ्यावी लागली. नव्याने निवडून आलेल्या राज्य शासनाने गावांच्या समावेशाबाबत चालढकल सुरू केल्याने समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल  केली. त्यावर गेली वर्षभर युक्तिवाद होत गेले. महापालिका निवडणुकीनंतर या प्रश्नांची उकल होणार असे दिसत होते; मात्र पुन्हा निर्णय पुढे ढकलला गेला. अखेर २७ एप्रिलला खंडपीठाने शासनाला  आठ दिवसांची अंतिम मुदत दिली व  ४ मे रोजी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदार, पालकमंत्री व समितीच्या सदस्यांना याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते. त्यावरूनच उद्या (गुरुवारी) शासन न्यायालयात या गावांचा समावेश महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत निर्णय जाहीर करणार आहे. महापालिका हद्दवाढीचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह व सुनियोजित विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया वडगाव-धायरीचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी व्यक्त केली. ३४ गावांतील नियोजनबद्ध विकास, तेथील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडवण्यास पालिकेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. या गावांसाठी नव्याने डेव्हल्पमेंट प्लॅनची अंमलबजावणी करून सर्वांगीण विकास महापालिका करेल. प्रशासनावर बोजा वाढणार असला, तरी पुणे महापालिका तो स्वीकारण्यास सक्षम आहे; मात्र आगामी काळात क्षेत्रफळ वाढणार असल्याने दोन महापालिका केल्यास विकास व प्रशासनाच्या दृष्टीने योग्य ठरेल, असेही चरवड यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया थांबणारया ३४ गावांतील बहुसंख्य भागात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. तेथील कचराही मनपाच उचलते. या गावांचा बोजा वागवण्याऐवजी सरळ ही गावे महापालिकेतच समाविष्ट करणे योग्य ठरेल.३४ गावांतील १६ गावांत ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र समावेशाचा निर्णय अपेक्षित असल्याने अजूनही फारशी रंगत नाही. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास निवडणुकांची प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. या गावांचा समावेश झाल्यास त्यांना लगतच्या प्रभागात समावेश करावा लागेल काय? किंवा नगरसेवकांची संख्या वाढणार काय? आताच्या प्रभागातील नगरसेवक या गावांच्या विकासाकडे कसे लक्ष देणार? या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे अस्तित्व काय? असे अनेक उपप्रश्न उपस्थित होणार आहेत.34 गावांतील ग्रामपंचायतीचा कर्मचारी वर्ग महापालिकेत समाविष्ट करावा लागणार आहे. या गावांतील शाळा महापालिका शिक्षण मंडळाच्या ताब्यात येतील. त्यामुळे शिक्षकांचेही नव्याने समायोजन करावे लागणार आहे. गावांतील जुन्या जलवाहिन्यांची पुनर्रचना, सांडपाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या गावात दिवसाआड एकवेळच पाणी येते. पाणीपुरवठा व्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागणार आहे.