शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पडवी झाले १५ वर्षांनंतर जलमय, जलयुक्त शिवार ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:15 IST

दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

वरवंड: दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामस्थांनी एकत्र येत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्व ओढ्यांचे आणि तलावांचे खोलीकर केले. जवळपास १५ वर्षानंतर यावर्षीच्या पावसात हे सर्व तलाव आणि आढे ओसंडून वाहू लागले आहे. जिरायती भागात ग्रामस्थांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.मनात ईच्छा असेल तर माणू काहीही करू शकतो ही म्हण पडवी ग्रामस्थांनी यथार्थ साध्य केली आहे. दुष्काळातून गावाला मुक्त करण्यातसाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावातील सर्व ओढे तसेच नाल्यांचे खोलीकरण जलयुक्त शिवार या अभियानाअंगर्तत ग्रामस्थांनी केले. यंदा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पडवी येथील ओढे नाले पाण्याने भरून वाहत आहे. गायकवाड मळा येथील पाझर तलावात पावसामुळे साचलेल्या पाण्याचे पुजन सरपंच राजेंद्र शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र शितोळे,आबा गायकवाड, लहु गायकवाड, संदीप शितोळे, सुरेश गायकवाड, निलेश शितोळे, अतुल गायकवाड, सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.>पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशीलगायकवाड मळयामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. जवळपास १० ते १५ वर्षांनी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावामध्ये एकूण २५ सिमेंट बंधारे व माती नाला ६९ बंधारे असून यासर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. गायकवाड मळ््यामध्ये जानाई शिरसाई माध्यमातून पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गायकवाड मळ््यातील पाझर तलावामध्ये पाणी मिळण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय मार्गी लावणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.- राजेंद्र शितोळे, सरपंच