शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात स्मार्ट सिटीची, योजना मात्र ‘अमृत’चीच

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशासन सतत करीत असलेल्या गवगव्यामुळे महापालिका पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्याही उंचावलेल्या अपेक्षांचा फुगा या योजनेचा तब्बल साडेतीन हजार कोटी

पुणे : स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशासन सतत करीत असलेल्या गवगव्यामुळे महापालिका पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्याही उंचावलेल्या अपेक्षांचा फुगा या योजनेचा तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर होताच फुटला आहे. नाव स्मार्ट सिटीचे, आतील कामे मात्र केंद्र सरकारच्या अमृत योजनेत होतील अशीच चर्चा त्यांच्यात सुरू झाली आहे. यासाठी लागणारे करोडो रुपये उभे कसे करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी पालिकेची खास सर्वसाधारण सभा ९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या दोन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांचा सूर योजना व तिचा प्रस्ताव कसा फसवा आहे असाच दिसतो आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेत अशाच वाहतूक, ड्रेनेज, स्वच्छता या समस्यांच्या निराकरणार्थ विविध योजना होत्या. त्यासाठी केंद्राकडून पैसे मिळणार होते. आता वेगळे काय होणार आहे असे बहुतेक नगरसेवकांचे मत आहे.यापूर्वीचे पालिका आयुक्त महेश पाठक यांनी संपूर्ण पुणे शहराचा तब्बल ८८ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता. आगामी ३० वर्षांचा विचार करून त्या आराखड्यातही याच प्रकारची अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. तो सगळा आराखडा केराच्या टोपलीत टाकून आता स्मार्ट सिटीसाठी पुन्हा नव्याने सल्लागार संस्था नियुक्त करून त्याच प्रकारच्या कामांचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा नवा आराखडा कशासाठी तयार करण्यात आला, असा प्रश्न तो सादर झाल्यानंतर नगरसेवकांना पडला आहे. प्रशासनाने उभ्या केलेल्या भव्य चित्रामुळे भारावलेले पदाधिकारीही प्रत्यक्ष आराखडा सादर झाल्यानंतर जमिनीवर आलेले दिसत आहेत. त्यामुळेच आता पक्षीयस्तरावर याचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारकडून ५००, राज्याकडून ५०० व महापालिकेचे २५० असे एकूण १ हजार २५० कोटी रुपये पाच वर्षांत मिळतील एवढेच काय ते या योजनेत नक्की आहे, उर्वरित रक्कम पालिकेला स्वबळावर उभी करायची आहे. ती कशी करायची हाही प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे. या योजनेच्या केंद्रीय सचिवांनी महापालिका कर्जरोखे काढू शकते, वित्तीय संस्थांकडून आपल्या मालमत्तेवर कर्ज घेऊ शकते किंवा कर आकारणे असा कोणताही पर्याय अवलंबू शकते असे स्पष्ट केले होते, त्यावरही आता पदाधिकाऱ्यांना विचार करावा लागणार आहे. जादा कर लादला तर मतदारांची नाराजी सहन करावी लागणार, कर्ज काढले तर संस्था कर्जबाजारी केल्याचा आरोप स्वीकारावा लागणार अशा पेचात सापडले आहेत. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी प्रस्तावातील कामांच्या सुसूत्रीकरणासाठी कंपनी स्थापन करण्यात येईल, असेही केंद्रीय सचिवांनी सांगितले होते. अशी कंपनी स्थापन केली की काय होते त्याचा अनुभव शहरातंर्गत प्रवासी वाहतुकीसाठी स्थापन केलेल्या पीएमपीएलमुळे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आला आहे. त्यामुळे आता प्रस्तावातील नियोजित कामांसाठी पुन्हा एकदा कंपनी स्थापन केली तर मग आपण करायचे तरी काय, असाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे. या सर्व गोष्टींवर पक्षीय बैठकीत चर्चा झाल्यानंतरच दोन्ही पक्ष सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी योजनेवर कार्य निर्णय घ्यायचा हे संयुक्तपणे ठरवतील असे दिसत आहे.