शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन

By admin | Updated: January 6, 2015 23:10 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांसह इतर पक्ष्यांचे झालेले आगमनामुळे गजबजून गेला आहे.

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांसह इतर पक्ष्यांचे झालेले आगमनामुळे गजबजून गेला आहे. तलावामधील बाभळीच्या झाडांवर या पक्ष्यांनी आपले वास्तव्य केले आहे. पाण्याची परिस्थिती चांगली असतानासुद्धा पक्ष्यांची संख्या मात्र यंदा कमी असल्याचे जाणवते. तरीपण पक्षी पाहण्यासाठी पर्यटक, पक्षिप्रेमी तलाव परिसरात गर्दी करीत आहेत. भादलवाडी येथील तलाव हा ‘चित्रबलाक’ पक्ष्यांची सर्वांत मोठी वसाहत किंवा सारंगगार होय. या ठिकाणी चित्रबलाक, ग्रेहरॉन, दर्वीमुख, स्पूनबिल, करकोचे, शेकोटी, बगळे, बदक, खंड्या या प्रमुख पक्ष्यांसह इतर जातींच्याही पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने हा तलाव पक्षिप्रेमींचे केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, एवढी मोठी नैसर्गिक रचना असतानासुद्धा पक्षी संवर्धनासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक अधिकारी, नेते मंडळी येतात. पक्षी पर्यटनाचा आनंद लुटतात. पर्यटनाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देतात. परंतु, या पलीकडे काहीच होताना दिसत नाही. यंदाच्या विणीच्या हंगामासाठीही चित्रबलाक पक्ष्यांनी गर्दी केली आहे. बाभळीच्या झाडांवर अनेक पक्षी घरटी बांधताना दिसतात. तसेच, या पक्ष्यांचा किलबिलाट जाणवतो. सर्वांत मोठे हे सारंगगार इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचले. पक्षी पाहण्यासाठी अनेक पर्यटक, पक्षिप्रेमी, पक्षिमित्र या ठिकाणी येत आहेत. मात्र, पाणी असल्याने जवळून पक्षी पाहण्याचा आनंद घेता येत नाही. वास्तविक पाहता, जलसंपदा किंवा वनविभागाने या ठिकाणी होडीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, या दोन्ही विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी साधे फिरकतानासुद्धा दिसत नाहीत. ४चित्रबलाक पक्ष्यांच्या हवेमध्ये विहंगमन करताना त्यांच्या कवायती नेत्रदीपक दिसत आहेत. तसेच, इतर विविध जातींच्या पक्ष्यांच्याही छबी टिपताना पर्यटक दिसतात. सर्वांत रेखीव पक्षी म्हणजे - चित्रबलाक उंच मान, गुलाबी चोच, रंगीबेरंगी पंख, आकाशामध्ये फिरताना तयार केलेला ‘व्ही’ आकार यामुळे तलाव परिसर पक्ष्यांनी बहरून गेला आहे. मुबलक खाद्यान्न, भरपूर पाणी, पाणथळ जागा व सुरक्षित ठिकाण यांमुळे पक्षी या ठिकाणी गर्दी करतात. पक्षीपर्यटनासाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे४पक्षी टेहळणीसाठी मनोरे उभारण्याची गरज आहे. तसेच, पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी तलावामध्ये जाण्यासाठी होडी अथवा बोट उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. पक्ष्यांची माहिती देण्यासाठी एक गाईड म्हणून रोजगार युवकांना उपलब्ध होईल. त्यासाठी तलावामध्ये सतत भरपूर पाणीसाठा असणे गरजेचे आहे. त्यानंतर हा परिसर पक्षी पर्यटनस्थळ म्हणून आणखी नावारूपाला येईल.