शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘बारामती’वर प्रगती, तर ‘लाला’वर ‘शिवनेर’चे वर्चस्व

By admin | Updated: March 10, 2015 04:52 IST

बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलने मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळविला.

बारामती : बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलने मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळविला. सर्व जागा जिंकून बँकेवरील वर्चस्व कायम ठेवले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जयसिंग ऊर्फ बबलू देशमुख यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर खुल्या गटात समीर बागवान, डॉ. विजय भिसे हे उमेदवार होते. त्यामुळे १० जागांसाठी १३ जागांवर लढत झाली. सर्वसाधारण गटाच्या १० जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ वाजता रयत भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास मिसाळ यांनी काम पाहिले. प्रत्येक फेरीसाठी ३०० मते मोजण्यात आली. २७ फेऱ्या पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार शिरीष दत्तात्रय कुलकर्णी (५,९३७), उद्धव सोपानराव गावडे (५,९४३), सुभाष रामचंद्र जांभळकर (६,०८७), दिग्विजय पोपटराव तुपे (६,२०४), रमणिक रामजीभाई मोता (६,०७२), अविनाश रमेश लगड (६,०१६), आदेश अनिलकुमार वडुजकर (६,०६७), देवेंद्र रामचंद्र शिर्के (५,८५५), सचिन सदाशिव सातव (६,१४५) आणि विद्यमान चेअरमन श्रीकांत मुरलीधर सिकची (५,७३७) विजयी झाले. तर, अनुसूचित जाती-जमातीच्या गटातून याच पॅनलचे विजय प्रभाकर गालिंदे (६,६४८) मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विजयकुमार भिसे यांना ८७९ मते मिळाली.महिलांच्या गटातून वंदना उमेश पोतेकर, कल्पना प्रदीप शिंदे, इतर मागास प्रवर्गातून कपिल राजेंद्र बोरावके, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून सुरेश गुलाबराव देवकाते हे बिनविरोध निवडून आले.राष्ट्रवादीचे नगरसेवक बबलू देशमुख यांना ३ हजार ११३ मते मिळाली. दुसरे विरोधी उमेदवार समीर अब्दुल करीम बागवान यांना १ हजार ८०, तर डॉ. विजयकुमार भिसे यांना ६४९ मते मिळाली. भिसे यांनी दोन गटांतून निवडणूक लढविली होती. (प्रतिनिधी)