शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन करणार सभेची ठिकाणे निश्चित

By admin | Updated: January 13, 2017 03:48 IST

शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी

पुणे : शहरात मैदानांची अपुरी असलेली संख्या व निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यासाठी एकाच वेळी होणारी मागणी यातून राजकीय कार्यकर्ते व प्रशासनामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी असणार नाही असे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कोणत्या ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घ्यायच्या आहेत त्याची यादी महापालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींकडून मागविल्या आहेत. या ठिकाणांवर सभा घेतल्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही व इतर प्रश्न उद्भवणार नाहीत याची पोलीस प्रशासनाकडून खातरजमा करून घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून सभा घेता येऊ शकतील अशा ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सभेला परवानगी द्यायची नाही असा धोरणात्मक निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.शहरामध्ये मोठ्या सभांसाठी खूपच कमी मैदाने उपलब्ध आहेत. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त मोठ्या सभांचे आयोजन करायचे झाल्यास सभेच्या जागांचा मोठा प्रश्न निर्माण होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने कॉर्नरसभावर भर दिला जातो. या सभांसाठी प्रत्येक प्रभागनिहाय सभांची ठिकाणे प्रशासनाला निश्चित करावी लागणार आहेत. या सभांना परवानगी देताना वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या जागांसंबंधी पोलिसांचा अभिप्राय घेतला जाणार आहे. निवडणुकीत सभांच्या ठिकाणांमुळे गोंधळ होऊ नये, यासाठी हे नियोजन केले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सभा, पदयात्रा यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. सभेसाठी जागा मालकाचे संमतिपत्र, मनपाचा ना हरकत दाखला जोडून अर्ज करावा लागणार आहे. सभेसाठी ध्वनिक्षेपाच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. मिरवणुका काढताना एकाच वेळी दोन मिरवणुका, पदयात्रा समोरासमोर येणार नाहीत याचे नियोजन पोलिसांना करावे लागणार आहे, त्यामुळे मिरवणुका काढण्यापूर्वी वेळेत त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांना बिनधास्त लुटता येणार संक्रांतीचे वाणमहापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना केल्या दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या भेटवस्तूंचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होण्याची भीती त्यांना वाटत होती. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांचा निवडणूक खर्चाचा हिशेब द्यावा लागणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २७ जानेवारीनंतर सुरूवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना संक्रांतीचे वाण लुटण्याबरोबरच अर्ज भरेपर्यंतच्या खर्चाचा कोणताच हिशेब द्यावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.