शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:57 IST

हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.

पुणे : मागील काही वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. त्यामुळे येथील तरुण द्वेषापोटी हातात शस्त्रे घेत आहेत. तसेच जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतात संवादाची भूमिका घेतली त्यावेळी काश्मीरमधील वातावरण शांत झाले होते. त्यामुळे हे हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले.डॉ. फैजल म्हणाले, सध्याचे सरकार हे काश्मीर प्रश्नाबाबत अपयशी ठरले आहे, कारण तेथे दररोज रक्त वाहत आहे. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे राजकारण करू नये, कारण आजवर तेथे पेटणाऱ्या आगीत तेल ओतण्याचे काम करण्यात येत असून, तसे न करता त्यात पाणी ओतून आग शांत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण काश्मीरवासीयांना नवी आशा देण्याची गरज आहे. तिथे रोज लोक मरत आहेत. जम्मू-काश्मीर मधील राजकीय परिस्थिती, येथील राजकारण तरुणाईला धरून नाही. मतदानास पात्र असून येथील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत. म्हणून मला तरुणांना सोबत घेऊन योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. काश्मिरी पंडित माझ्याशी सहमत आहेत.मतदान तरी का करावे...काश्मीर येथील वातावरण अत्यंत चिघळत चालले आहे. कारण तरुणांचे वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना तरुणांच्या मनात तयार झाली आहे. याचाच परिणाम त्यांचा आता राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आपला अधिकारच नाही तर आपण मतदान तरी का करावे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत, असे त्यांनी सांगितले.फैजल म्हणाले, या हिंसक वातावरणाला दोन्ही देशांमधील संवादाची भूमिका हा एकच पर्याय उरला आहे. काश्मिरी पंडितांशिवाय, जम्मू-काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मिरला बोलाविले पाहिजे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मिरचा प्रश्न सोडविला पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी