शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नाले वळविण्यासाठी प्रशासनच आग्रही

By admin | Updated: January 25, 2016 01:05 IST

शहरातील कोणताही नाला वळवून बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा मुख्य सभेने निर्णय घेतला असताना तो ठराव विखंडित करून बांधकाम व्यावसायिकांना नाला

दीपक जाधव,  पुणेशहरातील कोणताही नाला वळवून बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा मुख्य सभेने निर्णय घेतला असताना तो ठराव विखंडित करून बांधकाम व्यावसायिकांना नाला वळविण्यासाठी परवानगी द्यावी याकरिता प्रशासनानेच राज्य शासनाकडे धाव घेतली असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नाले वळविल्यामुळे छोट्याशा पावसानेही शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होत असताना प्रशासनाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महापालिकेच्या विविध विभागांनी गेल्या ५ वर्र्षांत मुख्य सभेने मंजूर केलेले किती ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविले हा प्रश्न जानेवारी २०१६ च्या मुख्य सभेसाठी विचारण्यात आला होता. त्याअंतर्गत प्रशासनाने दिलेल्या उत्तरामधून ही बाब उजेडात आली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी नाले वळविण्यात आल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अजय तायडे, प्रशांत कनोजिया व धनंजय दळवी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाल्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. त्यामध्ये अनेक ठिकाणी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचे, नाला ९० अंशात वळविल्याचे तसेच बंदिस्त केल्याचे या पाहणीमध्ये आढळून आले. याचा अहवाल मुख्य सभेसमोर मांडण्यात आल्यानंतर यापुढे नव्याने नाला वळवून बांधकाम करण्यासाठी कोणत्याही बांधकामाला परवानगी न देण्याचा निर्णय २० मे २०१४ रोजी एकमताने घेतला. प्रायमूव्ह संस्थेकडून शहरातील नाल्यांचे अस्तित्व, लांबी, रुंदी यांचा सर्व्हे करून त्यांची निश्चिती केली आहे, त्यानुसार कार्यवाही करण्याचे या ठरावामध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने मुख्य सभेचा हा ठरावच विखंडित करावा याकरिता राज्य शासनाकडे धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेकडे नाले वळविण्यासाठी परवानगी मागणारे १५० प्रस्ताव दाखल झालेले आहेत. भविष्यात येणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊ नये असे ठरावामध्ये नमूद होते. मात्र प्रशासनाने ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पत्र पाठविताना या ठरावामुळे परवानगी देण्यात आलेल्या इमारतींचे काम बाधित होत असल्याने ठराव विखंडित करावा असे नमूद केले आहे. नाले वळविण्याचा ठराव दफ्तरी दाखल करण्याचा ठरावही काही नगरसेवकांनी मुख्य सभेत मांडला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला. अखेर नजरचुकीने प्रस्ताव दिल्याचे नमूद करून सदस्यांनी तो मागे घेतला होता.