शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 03:40 IST

आयुक्तांचा प्रस्ताव पुढे ढकलला; प्रशासनाचे वर्गीकरणही अडविले

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीच्या वर्गीकरणासाठी नगरसेवकांकडून देण्यात येणाºया प्रस्तावांवर येत्या १५ डिसेंबरनंतर प्रशासकीय अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही, हा आयुक्त सौरभ राव यांनी ठेवलेला प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढे ढकलला. प्रशासनाने वर्गीकरणासाठी दिलेल्या ‘डेडलाईन’वरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.सदस्यांना डेडलाईन देण्यापूर्वी प्रशासनाने आपली कामेदेखील वेळेत पूर्ण करावीत, अशा तीव्र भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. प्रशासन सदस्यांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावांची अंमलबजावणी करणार नसले, तर त्याचे वर्गीकरण तरी का मंजूर करायचे? असा पवित्रा स्थायी समितीने घेतला.  यामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी कमी पडणारा साडेबारा कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव अडविण्यात आला आहे.पुणे महापालिकेच्या मंजूर बजेटमधील अन्य कामांसाठी निधीचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी नगरसेवक वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेला देतात. सर्वसाधारण सभेची मान्यता झाल्यानंतर या ठरावाची कार्यवाही करण्यासाठी ते प्रशासनाकडे येतात. त्यावर आयुक्तांची पूर्वमान्यता घेऊन त्यानंतर पूर्वगणनपत्रक मान्यता केली जाते. निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, यासाठी वेळ लागतो. त्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांत नगरसेवकांनी सुचविलेले वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर होऊनही प्रशासनाला प्राप्त झाले होते.आयुक्तांना त्या ठरावाच्या कार्यवाहीच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही केली होती; पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी मिळालेला अपुरा कालावधी यामुळे अनेक प्रस्तावांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, तर काही विभागांनी कामे पूर्ण करून घेतली. मात्र, निधी देताना आर्थिक वर्ष संपल्यामुळे वर्गीकरणाने उपलब्ध झालेल्या तरतुदीमधून निधीतून ही बिले अदा होऊ शकली नाहीत. त्यामुळे २०१८-१९च्या अंदाजपत्रकीय तरतुदीमधून हा निधी द्यावा लागला. ही बाब आर्थिक शिस्तीला धरून नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागांना प्राप्त होणारे १५ डिसेंबरनंतर प्राप्त होणाºया वर्गीकरणाच्या प्रस्तावाचा मंजुरीसाठी विचार होणार नाही, असा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी ठेवला होता. त्यावर स्थायीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली; परंतु आयुक्त ३ दिवस रजेवर आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र, आयुक्त नसल्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.प्रशासनामुळेच दिरंगाईअंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दर वर्षी ठरविण्यात येणार डीएसआर (कामांचे दर) निश्चित करणे आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी दोन-दोन महिन्यांचा कालावधी घेतला जातो. त्यानंतर विविध कामांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यासाठी बराच वेळ घेतला जातो. निविदा काढणे, त्याची वर्कआॅर्डर देणे ही कामे प्रशासनाकडून वेळेत होत नाहीत. यामुळे अंदाजपत्रकातील कामांसाठी खरे तर प्रशासनाकडूनच दिरंगाई होते. केवळ नगरसेवकांकडून वर्गीकरणाच्या प्रस्तावांना उशीर होतो म्हणून ते मंजूर न करणे हे चुकीचे आहे. प्रशासनाने आपल्या स्तरावर होणाºया दिरंगाईचा गांभीर्याने विचार करावा.- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका