शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: February 21, 2017 01:48 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी उद्या मंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

 बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी उद्या मंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ६ गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २७७ मतदान केंद्रांवर २ लाख ४७ हजार ८७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली.२७७ मतदान केंद्रांची स्थापना...मतदानासाठी तालुक्यात एकूण २७७ मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तसेच मतदारांच्या सोयीच्या दृष्टीनेही मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०१४, विधानसभा निवडणूक २०१४ तसेच नुकतीच झालेली नगर परिषद निवडणूक, या कालावधीत मतदान प्रक्रियेदरम्यान बारामती तालुक्यातील एकाही मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार अथवा गुन्ह्यांची नोंद झालेली नव्हती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १ ते ५, शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांसह ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे २३१५ कर्मचाऱ्यांची तालुक्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. या लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी पडू नये. मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. तरी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)