शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटीनिमित्त जादा एसटी

By admin | Updated: March 28, 2016 03:23 IST

उन्हाळी हंगामानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत.

पिंपरी : उन्हाळी हंगामानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत. बीड, त्र्यंबकेश्वर, उमरगा, धुळे व सासुर या भागातील जादा गाड्या १ एप्रिलपासून आरक्षणासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख अनिल भिसे यांनी दिली आहे.पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांकरिता वल्लभनगर आगारामार्फत पिंपरी-चिंचवड-निगडी ते गाणगापूर ही गाडी जेजुरी-नीरा-फलटण-पंढरपूर-मंगळवेढा या मार्गावरून जाणार आहे. ही गाडी सायंकाळी सहा वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता गाणगापूरला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गाणगापूरहून पिंपरी-चिंचवडला याच मार्गाने ही गाडी परत येईल. सध्या सकाळी गाणगापूरला जाण्यासाठी आगाराची एक गाडी आहे. आता प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर एक जादा गाडी सोडण्यात आली आहे. दुपारी दीड वाजता सांगली येथील वांगी गावासाठी गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी सातारा-कराडमार्गे जाईल. सायंकाळी साडेसातला वांगी येथे पोहोचेल. वांगीवरून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ला ही गाडी परत फिरेल आणि मध्यरात्री साडेबाराला आगारात पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्या मुक्कामी आहेत. याशिवाय सकाळी ६.१५ला बीड, ७.४५ला सासुर, १० ला धुळे, ११ ला त्र्यंबकेश्वर व रात्री ९.३०ला उमरगा या भागातही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. या गाड्यांचे एक एप्रिलपासून आरक्षण सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांसाठी गाणगापूर व वांगी या भागात जाण्यासाठी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या फेऱ्या मुक्कामी आहेत. याशिवाय बीड, त्र्यंबकेश्वर, उमरगा, धुळे, सासुर या भागासाठीही सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे एक एप्रिलपासून आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.- अनिल भिसे, आगारप्रमुख पिंपरी-चिंचवड एसटी आगार