शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अतिरिक्त आयुक्तपदाची पालिका अधिकाऱ्यांना संधी

By admin | Updated: February 7, 2015 23:54 IST

प्रशासनाच्या कामकाजामध्ये बळकटीकरणासाठी पालिकांमधील एका अतिरिक्त आयुक्तपदी आता पालिकेच्याच अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्यात येणार आहे.

पुणे : प्रशासनाच्या कामकाजामध्ये बळकटीकरणासाठी पालिकांमधील एका अतिरिक्त आयुक्तपदी आता पालिकेच्याच अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्यात येणार आहे. या बाबतचा आदेश नुकतेच राज्य शासनाने पालिकेस दिले आहेत. त्यामुळे या पदासाठी महापालिका अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.अतिरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी महापालिका अधिनियम कायदा ३९ अ मध्ये सुधारणा करण्यात आली असून, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पालिकेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेत या पदासाठी आठ ते दहा अधिकारी पात्र असून, अतिरिक्त आयुक्तपदासाठी या अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. पालिकेत सध्या तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. मात्र, यातील दोन पदांवरच राज्य शासनाकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती. एका पदाचा अतिरिक्त कारभार त्या अधिकाऱ्याकडे दिला जात होता. त्यामुळे एक पद रिक्तच होते. आता राज्य शासनाच्या बदलानुसार, अ वर्ग पालिकातील अतिरिक्त आयुक्तांचे पद संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांमधून भरण्यात येणार आहे. राज्य शासन करणार निवड ४पालिकेच्या सेवेत उपायुक्त दर्जाच्या पदावर अथवा पालिका अधिनियम ४५ नुसार, शासन मान्यताप्राप्त झाल्यानंतर निवडसुचीच्या १ जानेवारीपासून किमान १० वर्षे सेवा पूर्ण झालेला अधिकारी, १० गोपनीय अभिलेखापैकी ९ अत्युत्कृष्ट दर्जाखे अभिलेख असलेले अधिकारी या प्रमुख निकषांसह इतर निकष पूर्ण करणाऱ्या महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांची सूची महापालिकेने तयार करून राज्य शासनास पाठवायची आहे. या नावांमधील एका नावाची शिफारस करण्यासाठी शासनाने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, या समितीकडून या पाच अधिकाऱ्यांमधील व्यक्तींच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक केली जाईल.