शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:43 IST

वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता

राहुल गायकवाडपुणे : वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत होती. हातात रंगाचा डबा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दोघे प्रामाणिकपणे करत होते. एक एक दुभाजक ते रंगवत होते आणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत होते. आपल्या मेहनतीवर काही मिनिटांत मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत होते. दादा करणार तरी काय अन् बोलणार तरी कोणाला... वाईट तर वाटतं; पण आता लोकांना अडवू तर शकत नाही. आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत राहायचं एवढंच आमच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दोन कामगार बाळू गवळी आणि कैलास नलावडे आपली व्यथा मांडत होते.सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरून याच ठिकाणावरून गेला. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे पुण्याचे ब्रीदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटोप. परंतु, या रंगकाम कर्मचाºयांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र आहे. काल निळ्या व पांढºया रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी आपल्या आवडत्या लाल रंगाने रंगवले होते. हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमोरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत होते. हे चित्र पाहण्यापलीकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत जिवाचं रान करून हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु, त्यांनी केलेल्या कामावर पिचकाºया मारलेल्या पाहून या कर्मचाºयांना अत्यंत दु:ख होते. पोटाची खळगी भरण्यासाठीगपगुमान आपले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.या कर्मचाºयांचे मुकादम सुभाष साळुंखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत आहेत. वाहने वेगात येत असताना जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लोक पिचकाºया मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बोललं तर ते आम्हालाच दमदाटी करतात. आता थुंकणाºयांचे तोंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती आहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले आहे. त्यामुळे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाआधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.