वाकड : पत्नीच्या नावे बँकेत असलेले पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी अय्याश पतीने पत्नींचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडीत घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन सायंकाळच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुषमा विशाल साखरे (वय.२५,रा.) असे त्या महिलेचे नाव आहे. कैलास पांडुरंग बोडके (वय.५०, रा, बोडकेवाडी, माण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विशाल बाळासाहेब साखरे (वय. ३२, रा. डॉमिनोज पिज्झाच्या मागे हिंजवडी, ता मुळशी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तीन वर्षांपूर्वी साखरे कुटुंबियांनी त्यांची हिंजवडीतील काही जमीन दोन कोटी रुपयांना विकली. हे सर्व पैसे कुटुंबप्रमुख बाळासाहेब तुकाराम साखरे यांनी स्वत:च्या तसेच पत्नी, सून व मुलगा विशालच्या नावांवर ठेवले होते. ही रक्कम ५७ लाख होती. मात्र, व्यसनाधिन असणाऱ्या विशालला मौज-मजा करण्यासाठी स्वतच्या नावावरील रक्कम दोन वर्षातच उडविली. स्वत:कडील पैसे संपवून त्याने पत्नीच्या नावावर असलेल्या पैशांवर त्याचा डोळा होता. हे पैसे मला दे, अशी मागणी तो वांरवार करीत होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद होत असत. मंगळवारी विशालने नेहमीप्रमाणे मद्यपिऊन घरी येवून पत्नीकडे पैशांची मागणी करू लागला. त्यांच्यात भांडणे सुरु झाली भांडणे सोडविणाऱ्या आई-वडिलांनाही त्यांने वरच्या मजल्यावरील खोलीत कोंडले.(वार्ताहर)
व्यसनी पतीने केला पत्नीचा खून
By admin | Updated: January 15, 2015 00:04 IST