शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST

१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचीत प्रकार परिसरात न घडु नये यासाठी गेल्या वर्षीपासुन जिल्हाप्रशासन व पोलीस ...

१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचीत प्रकार परिसरात न घडु नये यासाठी गेल्या वर्षीपासुन जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्याप्रमाणावर कार्यरत झाले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष ठेवत आहेत. दंगलीच्या नंतर व्हाटस्अ‍ॅप ग्रुप, फेसबुक, सारख्या अनेक समाज माध्यमातुन समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ पसरवित असतात. त्यातुन सामाजिक स्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२१ च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापुर पोलीस ठाण्यातील १२० व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला या संदर्भात नोटिसा बजाविल्या आहेत.

व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकुर, व्हिडिओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या नोटिसा गुन्हा शाबितीकरणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत.

चौकट

तर भोगावी लागणार तीन वर्षाची शिक्षा

ग्रुप अ‍ॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षाही भोगावी लागणार आहे. ग्रुप अ‍ॅडमिनला येत्या काळात आपल्या ग्रुपवर लक्ष देण्याची गरज आहे.

-उमेश तावसकर, पोलिस निरीक्षक

चौकट :

ग्रुप अ‍ॅडमिन सावधान गुन्हा दाखल होईल

परिसारातील व्हॉट्‌सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन व ग्रूपमधील सभासदांनी ग्रुपवर समाजविघातक व आक्षेपार्ह मजकुर व्हिडीओ पोस्ट केल्यास किंवा कॉपी करुन इतर ठिकाणी सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला अटक करून कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनने सावधान राहण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केल्य आहेत.