शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई?

By admin | Updated: December 22, 2016 05:51 IST

शहरातील ज्या धार्मिक प्रार्थनास्थळांना सूचना दिल्या आहेत, त्या प्रार्थनास्थळांचे पुराव्यांसह अहवाल येत्या १० दिवसांत सादर

बदलापूर : शहरातील ज्या धार्मिक प्रार्थनास्थळांना सूचना दिल्या आहेत, त्या प्रार्थनास्थळांचे पुराव्यांसह अहवाल येत्या १० दिवसांत सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कागदपत्रे सादर न करणाऱ्या धार्मिक स्थळांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी बैठकीत दिली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे अथवा स्थलांतरित करणे, यासाठी पालिकेच्या कात्रप येथील श्रीजी सभागृहात सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार घोरपडे, मुख्याधिकारी देविदास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, सहा. नगररचनाकार सुदर्शन तोडणकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतीत जून महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे येत्या१० दिवसांत सर्वांनी आपापल्या धार्मिक स्थळांच्या पुराव्यांसह अहवाल सादर करावेत. हे अहवाल शासनाकडे पाठवण्यात येतील. १० दिवसांत अहवाल सादर झाले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी लागेल, असे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी या वेळी सांगितले. पालिका सभागृहात याविषयी प्रस्ताव सादर केला असता त्यालाही मंजुरी मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात लोकांना विश्वासात घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती करतानाच अधिकाराचा गैरवापर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक मसूद कोहरी यांनी दिला. प्रशासन कधीही कोणत्याही धार्मिक स्थळांना परवानगी मागितली तर देत नाही, असा आरोप कोहारी यांनी केला. आपण स्वत: आमच्या समाजातर्फेअशी परवानगी पालिका प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून मागत आहोत, परंतु अद्याप कोणतीही परवानगी पालिका प्रशासनाने दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. कोणतेही नियोजन करताना नियम हे लोकांसाठी आहेत की नियमांसाठी माणसे, याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. प्रार्थनास्थळ आधी झाले आहे कीरस्ता आधी, हेसुद्धा विचार करण्यासारखे आहे, असे भाजपाचे नगरसेवक किरण भोईर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)