शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव निंबाळकरमध्ये दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: April 29, 2017 03:51 IST

येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

वडगाव निंबाळकर : येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये येथील ग्रामपंचायतीचा सदस्यचा समावेश आहे. बुधवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास येथील बाजारतळावर हा प्रकार घडला. सागर दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल गायकवाड, ओंकार घोरपडे, विनायक गायकवाड, विश्वजित गायकवाड, कुणाल गायकवाड, राहुल गायकवाड, आकाश जाधव (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गायकवाड व घोरपडे या दोघांनी फिर्यादीचा चुलतभाऊ अक्षय सतीश जाधव याच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘तू आमच्यबद्दल लहान मुलांजवळ काय बोलतो. तुझ्यात दम असेल तर बाजारतळावर ये अशी धमकी दिली. यावरून फिर्यादी व राजेंद्र जाधव बाजारतळावर गेले असता जमावाने त्यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विरुद्ध बाजूने कुणाल अनिल गायकवाडने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सतीश जाधव (ग्रामपंचायत सदस्य), अक्षय जाधव, रंजित जाधव, राजेंद्र जाधव, सागर जाधव, गणेश जाधव, रोहन जाधव (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी बाजारतळावर गेले असता वरील सात जणांनी दगडाने लाथा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)