शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वाळूमाफियांवर कारवाई

By admin | Updated: March 2, 2016 01:09 IST

येथील शिवारातील मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून बेकायदेशीर पणे वाळूउपसा करीत असताना महसूल खात्याच्या पथकाने छापा टाकला.

बेल्हा : रानमळा (ता. जुन्नर) येथील शिवारातील मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून बेकायदेशीर पणे वाळूउपसा करीत असताना महसूल खात्याच्या पथकाने छापा टाकला. मात्र, वाळूचोर यंत्रसामग्री जागेवरच सोडून पळून गेले. पथकाने एक जेसीबी व एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिला. या पथकाने सोमवारी (दि. २९) पहाटे ही कारवाई केली.झापवाडी, मंगरुळ, बोरी, साकोरी, रानमळा आदी ठिकाणातील ओढ्यातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरटी वाहतूक होत होती. याची माहिती महसूल खात्याला होती. रानमळा येथील मदगुलेमळा या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयाचे पथक व जुन्नरचे मंडलाधिकारी सचिन मुंढे, डी. बी. काळे, गावकामगार तलाठी धनाजी भोसले, दिलीप पवार आदींचे एक पथक कारवाईसाठी गेले होते. या महसूल खात्याच्या पथकाने मदगुलेमळा वस्तीजवळील ओढ्यातून वाळू बेकायदेशीरपणे उपसा करीत असतानाच छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूचोरटे यंत्रसामग्री जागेवरच सोडून पळून गेले. महसूल खात्याच्या पथकाने वाळूचोरट्यांनी जागेवरच सोडून दिलेला एक जेसीबी व एक ट्रॅक्टर यांचा पंचनामा करून तो पोलिसांच्या ताब्यात दिला. याबाबत जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.(वार्ताहर)