शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: April 26, 2017 02:50 IST

चाकणमध्ये कित्येक दिवसांपासून दुचाकीस्वार व अवैध वाहतूक आणि अवास्तव वाहतूकधारकांनी नियम पायदळी तुडविण्याचा जणू घाट घातला होता.

आसखेड : चाकणमध्ये कित्येक दिवसांपासून दुचाकीस्वार व अवैध वाहतूक आणि अवास्तव वाहतूकधारकांनी नियम पायदळी तुडविण्याचा जणू घाट घातला होता. राजकीय पुढाऱ्यांच्या नावाखाली मोठे धाडस करून वागणाऱ्या वाहनचालकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून परत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सोमवार (दि. २४) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणच्या सिग्नल चौकात व आळंदीफाटा येथे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पकडलेली वाहने सोडविण्यासाठी काही पुढारी मंडळींनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती, फोनाफोनी करण्याचे प्रकार केले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पोलिसांनी दंडात्मक कारवाया करूनच संबंधित वाहने सोडली. याकामी बऱ्याच पोलिसांनी फोन बंद करणे पसंत केले. या भागात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना ठोकर देणे, मद्यपान करून वाहने चालविणे, पादचाऱ्यांना जखमी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.वाहतुकीचा बोजवारा आणि बेदरकार चारचाकी व दुचाकीस्वारांचा वाढता उच्छाद कमी व्हावा, बेशिस्त चालकांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळता यावी, हॉटेल व रस्त्यावरील दुकानांच्या बाहेरील वाहनांचा गराडा कमी व्हावा आणि वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ, महेश मुंडे, श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील साळुंखे, शिवाजी नऱ्हे, राजेंद्र हिले, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश दिघे, पोलीस नाईक संजय जरे, अमोल बोराटे व जिल्हा वाहतूक शाखेचे नेश्वर शेवरे, रितेश थरकार, दत्ता मोरे, राणी मोटे, रेश्मा फापाळे यांच्या दोन पथकाने दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. (वार्ताहर)