शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:08 IST

शाहदावल बाबा चौक ते संगमवाडी बीआरटी धोकादायक मार्गात घुसखोरी संदर्भात दैनिक ‘लोकमत’मध्ये ३१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल

विमाननगर : शाहदावल बाबा चौक ते संगमवाडी बीआरटी धोकादायक मार्गात घुसखोरी संदर्भात दैनिक ‘लोकमत’मध्ये ३१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई करून सुमारे शंभरहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंडाची वसूली करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून सुरक्षारक्षकांशी दमदाटी करीत हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत होते. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी बीआरटी मार्गातील अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.संगमवाडी ते शाहदावल बाबा चौक तसेच विश्रांतवाडी बीआरटी मार्गात वाहनचालक घुसखोरी करीत वाहने चालवितात. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील सुरक्षारक्षकांना दमदाटीचेही प्रकार घडत होते. महागड्या गाड्यांमधील घुसखोरी करणारे हे नियम मोडणारे वाहनचालक त्यांना अडविल्यास शिवीगाळ व दमदाटी करतात. या सर्व गंभीर परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’मधील वृत्तात घेतला होता. दिवसेंदिवस घुसखोरी करणाºया घटनांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच होते. हे वाहनचालक स्वत:बरोबरच दुसºयांचाही जीव धोक्यात घालून अपघाताला कारणीभूत ठरत होते. मागील आठवड्यात एका तरुणाचा संगमवाडी बीआरटी मार्गात अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या परिस्थितीची दखल घेऊन त्याचा लेखाजोखा प्रसिद्ध झालेल्या वृत्तात मांडण्यात आला होता.या वृत्ताची तत्काळ दखल घेत येरवडा वाहतूक विभागाने सलग दोन दिवस बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई केली. यामध्ये पहिल्या दिवशी ५७ तर दुसºया दिवशी ६१ अशा एकूण ११८ घुसखोरी करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बी. जी. मिसाळ यांनी दिली.