शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध वाहतुकीवर कारवाई

By admin | Updated: March 25, 2016 03:47 IST

पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक ‘लोकमत’मध्ये बातमी

लोणी काळभोर : पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच बंद करण्यात आली. काही अंशी पॅगो रिक्षा अद्यापही चालू असल्याने २५ मार्चपासून सहाआसनी रिक्षाचालक लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे चिंतामणी सहाआसनी रिक्षा संघाचे अध्यक्ष व पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.झेंडे म्हणाले, ‘‘सध्या हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरांत परवाना नसलेल्या आणि स्क्रॅप झालेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहाआसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. यासंदर्भात अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी व सहाआसनी रिक्षाचालकांना न्याय मिळावा, याकरिता रिक्षा संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, परिवहन विभाग, वाहतूक शाखा हडपसर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे ही अवैध प्रवासी वाहतूक २५ मार्चपर्यंत कायमस्वरूपी बंद न झाल्यास सर्व सहाआसनी रिक्षाचालक उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोकमतमध्ये बुधवारी (दि. २३) पुणे - सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक या मथळ्याखाली छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध झाली़ याची दखल घेऊन हडपसर वाहतूक शाखेकडून हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे - सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली़ मात्र, असे असूनही कालबाह्य (स्क्रॅप) करण्यात आलेल्या काही पॅगो रिक्षा अद्यापही पुणे- सोलापूर महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याने सर्व परवानाधारक सहाआसनी रिक्षाचालक २५ मार्चपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचा निर्णय श्री चिंतामणी सहाआसनी रिक्षा संघाच्या वतीने घेण्यात आला आहे. (वार्ताहर)