शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध माती उपशावर कारवाई

By admin | Updated: December 26, 2016 02:45 IST

बारामती व फलटण या दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी (दि. २५) पहाटे साडेचारच्यादरम्यान कोऱ्हाळे खुर्द

वडगाव निंबाळकर : बारामती व फलटण या दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी (दि. २५) पहाटे साडेचारच्यादरम्यान कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील नीरा नदीपात्रात चाललेला अवैधरीत्या माती उपशावर कारवाई केली. यामधे दोन पोकलँड मशिन ताब्यात घेऊन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये लावले आहेत.येथील नदीपात्रात असलेल्या बेटासारख्या भागावरून मातीउपसा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत अनेक नागरिकांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबतची खातरजमा होताच बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, नायब तहसीलदार एम. ए. भोसले, मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी अंकुश भगत, आशिष कदम यांच्यासोबत वडगाव निंबाळकर पोलीस, फलटण (जि. सातारा) येथील तहसीलदार विजय पाटील मंडल अधिकारी बी. पी. ढवळे यांच्यासोबत साखरवाडी (ता. फलटण) येथील पोलीस या सर्व अधिकाऱ्यांच्या टीमने पहाटे साडेचारच्यादरम्यान नदीपात्रात पाहणी केली. या वेळी अनेक वाहने मशिनच्या साह्णाने मातीउपसा करीत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांची टीम आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मातीमाफियांनी आपली वाहने पळवून नेली. पोकलँड मशिनमाफियांना नेता आली नाहीत. यामुळे ती तेथेच सोडून देण्यात आली. मशिन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन खोदकाम केलेल्या जागेचे मोजमाप अधिकाऱ्यांनी केले आहे. नदीच्या दोन्ही बाजूंकडून सुमारे पाचशे ब्रास माती काढल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. पात्रातील सर्व ठिकाणांचे मोजमाप केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.हद्दीचा वाद असल्याने कारवाई करण्यास अडथळे येत होते. बारामती भागाकडून महसूल अधिकारी कारवाईसाठी गेले तर हद्दीचे कारण सांगून माफिया अधिकाऱ्यांनाच धमकावत होते. यामुळे नदीच्या दोन्ही भागांकडून संयुक्त कारवाई होणे गरजेचे होते. यानुसार रविवारी कारवाई केली. पळून गेलेल्या वाहनांचे क्रमांक घेतले आहेत. ते बारामती आरटीओ कार्यालयाला कळवले जाणार आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. प्राथमिक पाहणीत दोन्ही बाजूकडून पाचशे ब्रास माती काढल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)