शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: May 8, 2017 02:06 IST

चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखान्याची उभारणी सुरू असून पायाभरणीसाठी लागणारा मुरुमचोरी होत

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुळी : चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखान्याची उभारणी सुरू असून पायाभरणीसाठी लागणारा मुरुमचोरी होत असल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निघोजे माळरानावर प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धाड टाकत मुरुमउपसा करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. त्यांच्याकडून १५०० ब्रास मुरुमाचा उपसा करण्यात आला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई महसूल विभागाने केली. निघोजे व कुरुळी परिसरात बेकायदा उत्खनन करून काही व्यक्ती मुरुमचोरी होत असल्याची तक्रार प्रांताधिकारी गाढे यांच्याकडे करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे निघोजे माळरानावर गाढे यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास गाढे यांच्या पथकाने मुरुमउपसा करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. महसूल विभागाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने सापळा लावून दोन डंपर जप्त केले.  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  उत्खनन करून अवैधरीत्या  गौणखनिज लंपास केल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले  आहे. निघोजे (ता. खेड) येथील जमीन गट नंबर २७८/१ अ, क्षेत्र ४.४६ आर येथे महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. मुरुम टाकलेल्या ठिकाणी ८० बाय ६५ चौमी जागेवर ८ ते ९ फूट उंचीचा मुरुमाचा भराव करण्यात आल्याचे व त्यासाठी तब्बल १२०० ते १५०० ब्रास मुरुम टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरुळी व निघोजेमधील अन्य ठिकाणचेही पंचनामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी घटनास्थळी पकडण्यात आलेली वाहने चाकण पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. त्यातील दोन डंपरवर (एमएच १२ एफसी ६६४७) हा एकच क्रमांक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. याची आरटीओकडून चौकशी करण्याचे व उत्खननाबाबतची चौकशी कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संबंधित वाहने न सोडण्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. कारवाईमुळे गौणखनिजचोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.