शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ववत न झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्ते ‌उखडून ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्ते ‌उखडून ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी असतानाही जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे, केबल्स टाकणे आदी कामांमुळे वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. खोदाईची कामे पूर्ण करून हे रस्ते ३१ मे पूर्वी पूर्ववत करण्याची अट घालण्यात आलेली आहे. या मुदतीमध्ये कामे पूर्ण न झाल्यास ठेकेदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत होणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागू शकतो. पालिकाच्या पथ विभागाने यावर्षी १५० किलोमीटर रस्ते खोदण्यास परवानगी दिलेली आहे. हे काम देखील वेळेत पूर्ण करावे लागणार आहे. शहरात वेगवेगळ्या कंपन्या आणि ठेकेदारांना खोदाईसाठी परवानगी देताना ३१ मेपूर्वी खोदाई पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे. आली आहे. मात्र, शहराच्या जवळपास सर्वच भागात खोदाई सुरूच आहे. त्यामुळे काम पूर्ण होणार की रस्त्यांवर भले मोठे खड्डे तसेच राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

---/---

जी कंपनी खोदाईचे काम करीत आहे त्यांनीच दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. उखडलेल्या डांबरी रस्त्यावर सिमेंट क्रॉक्रिटने दुरुस्ती केली जात आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खोदाईनंतर केलेला रस्ता खचल्याचेही समोर आले आहे.