शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशीही वाळूसम्राटांवर कारवाई

By admin | Updated: January 26, 2016 01:44 IST

उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून दिल्या. त्यामुळे वाळूसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

भिगवण : उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून दिल्या. त्यामुळे वाळूसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.आज कुंभारगाव (ता. इंदापूर) हद्दीत केलेल्या कारवाईत या अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटी उडविण्यात आल्या. काही वाळूमाफियांनी आपल्या बोटीवर कारवाई होऊ नये, म्हणून त्या पाण्यात बुडवून टाकल्या. तहसीलदार येवले यांनी पाणबुडीच्या साह्याने तपास लावून पाण्यातच बोटींचा श्रीगणेशा केला. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत ४७ बोटी फोडण्यात आल्या आहेत. यात वाळू माफियांचे २ कोटींच्या पुढे नुकसान झाले आहे. बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, दौंड, करमाळा (जि. सोलापूर) येथील तहसीलदार आणि इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या संयुक्त पथकाने वाळू माफियांचे नामोनिशाण मिटविण्यासाठी केलेल्या संकल्पाचे सामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे. वाळूउपसा करणाऱ्यांना मदत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर वाळूचोरीचा बोजा नोंद करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याने वाळूमाफियांनी उजनीपासून दूर राहणेच पसंत केल्याचे चित्र दिसले. (वार्ताहर)