शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनाई दूध’वर कारवाई होणार

By admin | Updated: June 20, 2016 01:05 IST

वेल्हे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सोनाई दूध वाहतूक संस्थेने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सोनाई दूध वाहतूक संस्थेने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी प्रसिद्धिपत्रकात दिली. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, वेल्हे तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची पाहणी आपण गटविकास अधिकारी गोकूळदास बैरागी यांनी केली होती. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी गावे टंचाईग्रस्त असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानंतर १० मे ला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टेकपोळे, मेटपिलावरे, चराटवाडी, वरोती, गेळगाणी, कुसारपेठ यांनी मंजुरी देऊन टँकर सुरू करण्याचे आदेश पुणे जिल्ह्यात टँकर पुरवठा करणाऱ्या इंदापूर येथील सोनाई दूध संस्थेस दिले होते.मेटपिलावरे, चराटवाडी, वरोती, गेळगाणी, कुसारपेठ या गावांना लाभशेटवार यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली असता, गावातील महिलांना व लहान मुलांना गावापासून एक ते दोन किलोमीटर वरून पायपीट करावी लागत असल्याचे दिसून आले.या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लाभशेटवार यांनी वारंवार सोनाई दूध संस्थेशी संपर्क केला व टँकर न पुरवठा केल्याबद्दल नोटीस देऊन खुलासा मागितला होता. परंतु, सोनाई संस्थेकडून कोणताही खुलासा न आल्याने दंडात्मक कारवाईपोटी १,३३,५०० रुपये दंड वसूल करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी दिली. (वार्ताहर)