शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गौरव पासलकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगारांची कंबर मोडीत काढताना पुण्यातील गुन्हेगारीला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत गुन्हेगारांची कंबर मोडीत काढताना पुण्यातील गुन्हेगारीला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक दणका दिला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरव पासलकर टोळीवर आता संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

गौरव सुरेश पासलकर, मंगेश विजय जडीतकर, पल्लू कमलेश चौधरी आणि राजू लक्ष्मण गेहलोत अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

वारजे माळवाडी येथील गोकुळनगरमधील वसुधंरा सोसायटी येथे १३ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गौरव पासलकर व त्याच्या तीन साथीदारांनी विकास विष्णू जानावळे (वय २६, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले होते. तसेच त्याच्या खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. कोयत्याने मारहाण केली होती.

याप्रकरणात गौरव पासलकर आणि मंगेश जडीतकर यांना अटक करण्यात आली होती. तपासामध्ये पासलकर हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्या अधिपत्याखाली तो इतर साथीदारांना घेऊन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पासलकर याच्या टोळीवर दरोडा, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीर घरात घुसणे, शस्त्राचा धाक दाखवून धमक्या देणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. डॉ. शिंदे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

.........

आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २३ वी कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्ह्याच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन कडक कारवाई करण्याबाबत व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासंबधी सूचना केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही २३ वी कारवाई आहे. या वर्षातील ही मोक्काची १७ वी कारवाई आहे.