शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार २१ वाहतूक पोलिसांवर कारवाई

By admin | Updated: March 5, 2016 00:51 IST

वाहतूक नियमनात कामचुकारपणा करणाऱ्या २१ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे : वाहतूक नियमनात कामचुकारपणा करणाऱ्या २१ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. वेळोवेळी सूचना करूनही कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.मागील दोन महिन्यांत नेमणुकीचे ठिकाण सोडून जाणे, नियंत्रण कक्षातील फोनला उत्तर न देणे, कामाच्या वेळी फोन बंद करून ठेवणे, महत्त्वाच्या चौकात वाहतूककोंडी झाली असताना हजर न राहणे अशा विविध कारणांवरून २१ पोलिसांवर ही कारवाई केली आहे. याबाबत या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी कामचुकारपणा केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड म्हणाले, ‘‘काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाला सांगून नेमणुकीचे ठिकाण सोडण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पण, याकडे दुर्लक्ष करून काही कर्मचारी चौक सोडून निघून जातात. भेट दिल्यानंतर काही वेळेला चौकात कर्मचारी नसल्याचे आढळून येते. नियंत्रण कक्ष किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रतिसाद मिळत नाही. त्यांचा मोबाईल बंद असल्याने काही वेळा अडचणी उद्भवतात. अशा २१ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.’’