शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडच्या टँकरने दोघांना चिरडले

By admin | Updated: April 18, 2015 23:33 IST

अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घेऊन भरधाव जात असताना टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची दुचाकीला धडक बसून तो पलटी झाला.

नीरा : अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घेऊन भरधाव जात असताना टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची दुचाकीला धडक बसून तो पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दौंडज (ता. पुरंदर) येथील पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर हा अपघात घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे मंगेश लक्ष्मण कदम (वय २३, रा. दौंडज, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि सुरेखा नामदेव यादव (४५, माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून नीरालगत निंबूत (ता. बारामती) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची वाहतूक करणाऱ्या टँकर (एमएच ०४-एफयू ६५९१)वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकून पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधील अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती होऊ लागल्याने पालखी मार्गासह दौंडज परिसरात घातक दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरू लागली. परिणामी, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांना नाकाला रुमाल लावून जावे लागत होते. डोळ्यांना अ‍ॅसिडच्या झळा लागत होत्या. पोलिसांना या अपघाताची खबर मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासमवेत तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. (वार्ताहर)४घटनास्थळी ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलासमवेत पोहोचण्यास बराच विलंब लावला. अखेर नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव हे ज्युबिलंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अग्निशमन दलासमवेत घेऊन घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यानंतर आणखी जादा क्रेन आणून तसेच अ‍ॅसिडच्या तीव्रतेवर प्राथमिकरीत्या अग्निशामक दलाच्या मदतीने नियंत्रण आणून अखेर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.