शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर

By admin | Updated: May 21, 2017 03:55 IST

वाहनचोरी, मोबाईलचोरी अथवा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांबरोबर अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येतो. शाळेत शिकण्याच्या वयात ही मुले

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : वाहनचोरी, मोबाईलचोरी अथवा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांबरोबर अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येतो. शाळेत शिकण्याच्या वयात ही मुले गुन्हेगारी कृत्यात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी अर्धवट शिक्षण सोडावे लागलेली मुले हॉटेलात, गॅरेजमध्ये काम करताना दिसून येतात़ अलीकडे असे काम करण्याकडे मुलांचा कल दिसून येत नाही. चोरी, घरफोडी हा मौजमजेसाठी पैसे मिळविण्याचा शॉटकर्ट मार्ग त्यांनी अवलंबला आहे. स्थानिक गुडांना आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारी ही मुले अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर आहेत. याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग वाढतो आहे. चिंचवड पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत दुचाकी व मोबाईल पळविणारे आठ आरोपी पकडले. त्यातील पाच आरोपी अल्पवयीन होते. तत्पूर्वी पिंपरी, भोसरी आणि अन्य परिसरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. केवळ चोरीच्या गुन्ह्यातच नाही तर खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अर्धवट शिक्षण, हाताला काम नाही त्यामुळे लहान मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत.स्थानिक गुंड आदर्शस्थानिक गुंड हे आपले आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा काही मुले प्रयत्न करीत आहेत. गुंडाचे वाढदिवस साजरे करण्यात अशा मुलांचा पुढाकार दिसून येऊ लागला आहे. पिंपरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, अजंठानगर, भोसरी, निगडी, चिंचवड या भागांत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या भागात वेगवेगळ्या नावाने ग्रुप तयार केले आहेत. हे ग्रुपच भविष्यात गुंडांच्या टोळ्यांमध्ये रूपांतर होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. - शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे विविध घटनांच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. दुचाकी तसेच मोबाईल चोरट्यांची टोळी जेव्हा पकडली जाते, त्या वेळी त्यात निश्चितपणे काही आरोपी अल्पवयीन असतात.