शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना शिक्षा होईपर्यंत शेवटचा श्वास घेणार नाही

By admin | Updated: July 16, 2016 00:59 IST

‘माझ्या नातवाकडून काही चुकले असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली असती, तर नक्कीच आम्ही त्याला समजावले असते;

इंदापूर : ‘माझ्या नातवाकडून काही चुकले असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली असती, तर नक्कीच आम्ही त्याला समजावले असते; मात्र ज्या पद्धतीने रश्मीकांतचा निर्घृण खून केला. तत्कालीन दोन सहायक पोलीस निरीक्षकांनी तपास करताना हलगर्जीपणा दाखविला. आता या खून प्रकरणात आरोपींना व पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत शेवटचा श्वास घेणार नाही,’ अशा शब्दांत बावडा येथील रमाकांत तोरणे यांनी भावना व्यक्त केल्या. रश्मीकांत रजनीकांत तोरणे (वय १९, रा. बावडा) याचा १५ मार्च २०१५ रोजी अपहरण करून खून करण्यात आला. ‘माझा नातू बेपत्ता झालेला नसून त्याचे अपहरण करण्यात आले आहे’ असे सांगून काही संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली. मात्र, सुरुवातीपासूनच पोलिसांनी या तरुणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा दाखविला. रश्मीकांतचा तपास लागत नव्हता. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन सोडून दिले. चार महिन्यांनी तोरणे कुटुंबीयांनी रास्तारोको आंदोलन केले.तेव्हा तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी गुन्हा दाखल केला. दि. २७ जुलै रोजी मुख्य आरोपी भारत सोनवणे वगळता इतरांना अटक केली.रश्मीकांतचे अपहरण झाले आहे. त्याचा घातपात होण्याची शक्यता आहे, असे सांगूनदेखील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी तोरणे कुटुंबीयांच्या तक्रारीप्रमाणे फिर्याद घेतलीच नाही. त्यानंतर त्यांच्या जागी आलेले सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी आरोपींचा केवळ जबाब घेऊन सोडले. (वार्ताहर)