शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या खूनप्रकरणातील आरोपीस अटक व कोठडी

By admin | Updated: May 31, 2017 01:37 IST

येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कँपमधील खोलीसमोर

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कँपमधील खोलीसमोर शिवकुमार साहू या परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या सहाय्याने खून करणाऱ्या त्याचा गाववाला अशोक भागबली यादव यास त्याचे मूळ गाव (मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, राज्य छत्तीसगड) येथे जेरबंद करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले असून न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील खोलेवस्तीसमोरील गट क्रमांक ३५६ मधील फोर अ‍ॅव्हेन्यू या सदनिकेच्या बांधकाम साईटवर हा प्रकार २२ मे रोजी पहाटे घडला होता. यामध्ये शिवकुमार धनाराम साहू (वय ४१) याचा खून झाला होता. घटना घडल्यापासून त्याचा साथीदार अशोक भागबली यादव (वय २८, दोघे रा. मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, राज्य छत्तीसगड) घटना घडल्यापासून फरार होता.मृत शिवकुमार साहू व त्यांचा गाववाला अशोक यादव दोघे गेल्या दोन महिन्यांपासून फोर अ‍ॅव्हेन्यू या सदनिकेतील सी व डी बिल्डिंगच्या बांधकामाच्या वॉटरप्रुफिंगचे काम करीत होते. ते दोघेही त्याच बांधकाम साईटवर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते. खुनाचा हा प्रकार सोमवारी (दि. २२) सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांनी लेबर कँपमधील इतर कामगारांकडे चौकशी केली असता त्यांना यादव व मृत साहू दोघे रविवारी (दि. २१) रात्री खोलीसमोर झोपले होते. परंतु त्या दोघांत रात्री कोणत्या तरी कारणांवरून भांडण झाले होते, अशी माहिती त्यांना समजली. या ठिकाणची परिस्थिती पाहता अशोक यादव यानेच रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तेथे पडलेल्या दगडांनी शिवकुमार साहू याच्या डोक्यात मारहाण करून त्यास जखमी करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.पोलिसांनी व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अशोक यादव याचा हिंजवडी, रावेत, चांदणी चौक, हंडेवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सदनिका उभारण्याची कामे चालू आहेत. त्या ठिकाणी शोधमोहीम राबविली होती.