शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा असल्याने आरोपीचा जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंबड्या चोरून नेल्याच्या आरोपातून दोघांनी सत्तूरने डोक्यात आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोंबड्या चोरून नेल्याच्या आरोपातून दोघांनी सत्तूरने डोक्यात आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. पौड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. जवळपास गेल्या एक महिन्याहून अधिक काळ ते कारागृहात आहेत. त्यांच्यातील एकाची परीक्षा असल्याच्या कारणावरून न्यायालयाने विद्यार्थ्याला जामीन मंजूर केला.

रजत हिरामण दगडे (वय २०, रा बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने ॲड. ऋषीकेश सुभेदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचे नातेवाईक् गणेश दिलीप शेडगे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी विजय येनपुरे (वय ३९, रा. भूगाव) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शेडगे यांच्या गोठ्यातून कोंबड्या चोरीला गेल्या होत्या. त्या फिर्यादी यांना चोरल्याच्या संशयावरुन येनपुरे यांना २९ डिसेंबर रोजी बेदम मारहाण करण्यात आली होती. गैरसमजातून ही मारहाण झाली. यावेळी भांडणे साेडविण्यासाठी आलेल्या अश्वजित पवळे व सूरज शेडगे यांनाही मारहाण झाली होती.

याप्रकरणी दगडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. आपली परीक्षा आहे. तसेच वादात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा न सापडल्याने जामीन देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. तो ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोने यांनी दगडे याचा जामीन मंजूर केला.

आरोपी हा शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवले तर शिक्षण आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.