शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुमळे हत्या प्रकरणात आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:53 IST

येथील बेलघाटा वॉर्डात १२ दिवसांपूर्वी ज्योत्स्ना जुमळे या विवाहितेची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान तपासाअंती पवनीतील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शंकर वंजारी याने ज्योत्स्नाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. पवनी न्यायालयात शनिवारी हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील बेलघाटा वॉर्डात १२ दिवसांपूर्वी ज्योत्स्ना जुमळे या विवाहितेची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान तपासाअंती पवनीतील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शंकर वंजारी याने ज्योत्स्नाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. पवनी न्यायालयात शनिवारी हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.२६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ज्योत्स्ना जुमळे या विवाहित महिलेची हत्या करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी तपासाची चक्रे फिरवीत विविध प्रकारे तपास सुरु केला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळविले. हत्या प्रकरणात १२ व्या दिवशी शंकर वंजारी रा.पवनी हल्ली मुक्काम पुणे यांच्या बयाणात विसंगती आढळली. यावर सखोल चौकशी करुन वंजारी याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२, १२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पवनी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने वंजारीला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. जुमळे यांची हत्या कोणत्या कारणाने केली यासह अन्य प्रश्नांचा उलगडा तपासाअंती होणार आहे.