शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप

By admin | Updated: February 16, 2016 01:31 IST

अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. १४) गायरान जमिनीवरील अतिक्रमणाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रणधारकांना पाठीशी घातल्याचा आरोप अंथुर्णे ग्रामपंचायतीने केला आहे.

अंथुर्णे : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. १४) गायरान जमिनीवरील अतिक्रमणाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रणधारकांना पाठीशी घातल्याचा आरोप अंथुर्णे ग्रामपंचायतीने केला आहे. तसेच, कारवाईवेळी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या निलंबनाचीही मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. अंथुर्णे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे धनदांडग्यांसोबतच सर्वसामान्य ग्रामस्थांनीही अतिक्रमण केलेले आहे. सदरचे अतिक्रमण बाजारतळ, पालखीतळ, गावातील धार्मिक स्थळे, शाळा सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमुसार सहा महिन्यांच्या आतील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय रविवारी (दि. १४) ग्रामपंचायतीने घेतला. वैयक्तिक द्वेष न ठेवता आम्ही ही कारवाई सुरू केली होती. परंतु या वेळी ग्रामस्थ व काही व्यक्तींनी गोंधळ घातला. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तहसीलदार यांना आपले लक्ष्य केले. या सर्व गोंधळात पोलीस प्रशासनाने कायद्याला बगल देऊन अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही ग्रामपंचायतीने केला आहे. पोलिसांसहित सर्वांनीच ग्रामपंचायत प्रशासनाच्याच विरोधात एकतर्फी काम केल्याने हे अतिक्रमण काढणे ग्रामपंचायत प्रशासनास अशक्य झाले. परिणामी कारवाई थांबविणे भाग पडले. परंतु यापुढे ग्रामपंचायत अतिक्रमणाबाबत कायदेशीर मार्गाने अख्ांड लढा देणार आहे.भविष्यात अंथुर्णे व परिसरात एकही अवैध बांधकाम व अतिक्रमण होऊ देणार नाही, असेही ग्रामपंचायतीने म्हटले आहे. या परिपत्रकावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)