शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या चेंबरमुळे अपघात

By admin | Updated: March 30, 2017 00:10 IST

अवसरी खुर्द (ता. अांबेगाव) येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार योजनेचे काम

अवसरी : अवसरी खुर्द (ता. अांबेगाव) येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार योजनेचे काम पूर्ण झाले. गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर, गावठाणात १७ ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी चेंबर बांधले आहे. या चेंबरच्या वर झाकण न टाकल्याने या चेंबरमध्ये चारचाकी, दोनचाकी वाहने जाऊन अपघात झाले आहे. चुकीच्या ठिकाणी चेंबर उभारल्याने अपघातात वाढ होत आहे.काही ग्रामस्थांनी चेंबरमध्ये पाणी सोडण्याऐवजी दगड-गोटे आणून टाकले आहे. शासन निधी भरपूर देणे व त्या निधीची उपयोग ग्रामपंचायतीने योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्य शासनाच्या आदर्श आमदार योजनेअंतर्गत अवसरी खुर्द हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदिस्त गटार योजनेचे काम केले. परिसरातील घरांचे सांडपाणी सोडण्यासाठी १७ चेंबर बनविण्यात आले. चेंबरचे काम पूर्ण झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने हे चेंबर जागोजागी तोडून त्यातून नळपाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. चेंबर तोडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या तोडलेले चेंबर लक्षात येत नाहीत. खालची वेस व रवींद्र कोष्टी यांच्या घरालगत धोकादायक चेंबर बांधल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने दोन्ही ठिकाणची जागा बदलून इतर ठिकाणचे चेंबर दुरुस्त करून चेंबरला लोखंडी झाकणे टाकावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे. (वार्ताहर)बाराही महिने पाणीगावठाणांतर्गत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या लोखंडी पाइप लाइनसाठी दोन वर्षांपूर्वी १ कोटी रुपये मंजूर होऊन काम चालू झाले. ग्रामपंचायतीचे योग्य नियोजन नसल्याने तीन वेळा लोखंडी पाइपलाइन गाडली, उकरली. परंतु, अद्याप नवीन पाइपला पाणी सोडले नाही. गावठाणात बाराही महिने दिवसाआड पाणी सोडले जाते. परंतु, नळपट्टी वर्षाची घेतली जाते. याला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. गावच्या नळपाणी योजनेच्या कामसाठी अद्यापपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा उपयोग योग्यरीतीने होतो किंवा नाही, याची चौकशी करून दोन वर्ष नळपाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने चालू आहे याची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहे.