शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेंगाळलेल्या रुंदीकरणामुळे अपघात

By admin | Updated: January 18, 2016 01:09 IST

पुणे-सातारा महामार्गाच्या रुंदीकरण व विकसनाची वाट गेली दोन-तीन वर्षे नागरिक पाहत आहेत. दिवसागणिक शिंदेवाडी ते सारोळा (ता. भोर) दरम्यान पुणे-सातारा

कापूरव्होळ : पुणे-सातारा महामार्गाच्या रुंदीकरण व विकसनाची वाट गेली दोन-तीन वर्षे नागरिक पाहत आहेत. दिवसागणिक शिंदेवाडी ते सारोळा (ता. भोर) दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर नवनवीन अपघात वेगवेगळ्या ठिकाणी होऊन यात वाहनचालक प्रवासी व नागरिकांचा बळी जात आहे. कित्येकांना अपंगत्व आले तर काही जबर जखमी झालेले आहेत. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि याला कारणीभूत आहेत ते अर्धवट रस्ते, असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केलेला आहे.काल मध्यरात्री साताऱ्याहून पुण्याकडे निघालेली मारुती गाडी (एम.एच. ११ ७५७६) रात्री पुण्याकडे जात होती. कामथडी गावच्या हद्दीत कापूरहोळपासून एकसंध तीनपदरी असलेल्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. अचानक दोन पदरी झालेल्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी दोनपदरी रस्त्याच्या साईडपट्टीला मोठा खड्डा असलेल्या ठिकाणी अपघातग्रस्त झाली. प्रवासी जखमी झाले व गाडीचे मोठे नुकसान झाले. यास कारणीभूत अर्धवट रस्ते व दिशादर्शक न लावल्यामुळे असे अपघात महामार्गावर होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.पुणे-सातारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे रात्रंदिवस वाहतूक दळणवळण असते. गाड्यांचा वेगही प्रचंड असतो. मागील आठवड्यात कामथडी येथे रस्ता रुंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे तीन दुचाकीस्वार अपघातात जबर जखमी झाले होते. लोखंडाची अवजड वाहतूक करणारा कंटेनर याच हद्दीत उलटला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. याचा नाहक त्रास भोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याने महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेकडे स्पीडगन ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा अवस्थेत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर महामार्ग पोलिसांनी सांगितली. जेणेकरून या स्पीडगन यंत्रणेमुळे बेलगाम भरधाव दुचाकीस्वारांवर आळा बसेल व भविष्यात असे अपघात टाळता येतील.पुणे-सातारा महामार्गावर धावणारी वाहने नियंत्रण सुटल्याने पुढच्या वाहनांवर जाऊन आदळणे, रस्त्याच्या कडेला उलटणे, दुभाजक ओलांडून समोरील वाहनांना अपघात होणे या घटनांना कारणीभूत रखडलेले महामार्गाचे रुंदीकरण अशी चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर)