शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाण लुटण्यासाठी अ‍ॅक्सेसरीज

By admin | Updated: February 4, 2016 01:39 IST

पूर्वीपासून मकरसंक्रातीचे निमित्त साधत हळदी-कुंकू हा महिलांच्या आवडीचा कार्यक्रम अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते राबवीत असतात

रहाटणी : पूर्वीपासून मकरसंक्रातीचे निमित्त साधत हळदी-कुंकू हा महिलांच्या आवडीचा कार्यक्रम अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते राबवीत असतात. त्या वेळी सुवासिनीला वाण म्हणून प्लॅस्टिकचे डबे, गाळणी, चमचे, कंगव्याचा सेट यासह संसारोपयोगी वस्तू दिल्या जात होत्या. मात्र सध्या त्याची जागा हेडफोन, मोबाइल कव्हर, मोबाइल स्टॅँड, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, पॉवरबॅँक, सीडी, डीव्हीडी अशा हायटेक अ‍ॅक्सेसरीजने घेतली आहे. आधुनिक जगतातील आधुनिक नारी आता संक्रांतीचे वाण लुटताना हायटेक झाल्याचे दिसून येते. अ‍ॅक्सेसरीजबरोबरच मॉड्यूलर किचनला शोभतील आणि गृहिणींचे काम सोपे करतील, अशा वस्तूंचाही यंदा वाणात समावेश आहे. त्यात फ्रीजसेफ कंटेनर्स, मायक्रोवेव्ह सेफ, प्लॅस्टिकचे बाऊल, मायक्रोवेव्ह सेफ मग, पेंटजार्स, स्लायसर, रोटी प्लेट, फ्रूट कटर, लसूण सोलणी आदींचा समावेश आहे. बऱ्याच महिला मैत्रिणींची गरज ओळखून व वाण डबल होणार नाही याची काळजी घेत नवनवीन प्रकार शोधत आहेत. वाणातले हायटेक आयटम घाऊक प्रमाणात खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केटची मदत घेतली जात असून, काही महिलांनी, तर आॅनलाइन आॅर्डर देऊन वस्तू मागविण्यावरही भर दिलेला दिसून येत आहे. यंदा महिलांचा वैविध्यपूर्ण वस्तूंची भेट देण्यावर भर आहे. हटके पर्यायांना मागणीसंक्रांतीचे वाण लुटताना यंदा महिला वैविध्यपूर्ण, टिकाऊ व किफायतशीर दरातल्या वस्तूंची मागणी करीत आहेत. नवीन प्रकारांना त्या प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मुखशुद्धीचे बॉक्स, टिफिन बॉक्स यांना मागणी आहे. वाणाच्या वस्तूंबरोबरच हळदी-कुंकवाच्या डब्याही आवर्जून घेतल्या जात आहे. हळदी-कुंकू, हलवा पॅकबंद असणाऱ्या डब्यांना मागणी आहे.- एक विक्रेता