शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अबब....देशात सव्वा अब्ज मोबाईल!!!; दिल्लीत सर्वात जास्त मोबाईलधारक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:34 IST

दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. 

ठळक मुद्देदिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईलमोबाईलवापरात बिहार सर्वात गरीब राज्य ठरले असून, येथील सरासरी अवघी ६०.८२ इतकी

विशाल शिर्के पुणे : जगाची लोकसंख्या ही साडेसात अब्ज इतकी मानली जाते. त्यात चीन पाठोपाठ देशाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. यात मोबाईलची संख्या पाहिल्यास ही तब्बल १२१ कोटी इतकी भरते. दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. चीनची लोकसंख्या ही १३८ कोटी दरम्यान आहे. त्यानंतर भारतात १३२ कोटी ४१ लाख जनसंख्या येते. वापराच्या आणि किंमतीच्या दृष्टीने मोबाईल आवाक्यात आल्याने दूरसंचार उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. वैयक्तिक संपर्काच्या दृष्टीने उपयोगित असल्याने अगदी गरीबातील गरीब आणि श्रीमंताच्या हातात या यंत्राने आपले स्थान पक्के केल्याचे दिसून येत आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या प्रफुल सारडा यांना ३१ आॅगस्ट २०१७ अखेरपर्यंतची मोबाईलची आकडेवारी माहिती अधिकारात उपलब्ध करुन दिली आहे. त्या नुसार राजधानी दिल्लीने प्रथम क्रमांक पटाकविला आहे. येथे दर शंभर लोकसंख्येमागे २४६.१४ मोबाईल आहेत. पाठोपाठ कोलकाता येथे १८४.३६ आणि मुंबईत १५४.६८ मोबाईल आहेत. हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळा, पंजाब आणि तमिळनाडूत प्रतिशंभर लोकसंख्येमागे सरासरी शंभराहून अधिक मोबाईल आहेत. मुंबई वगळून उर्वरीत महाराष्ट्रात दरशंभर लोकसंख्येमागे ९४.१२ मोबाईल आहेत. मोबाईलवापरात बिहार सर्वात गरीब राज्य ठरले असून, येथील सरासरी अवघी ६०.८२ इतकी आहे. नीचांकी मोबाईल वापरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आसाममध्ये शंभरामागे ६६.९० मोबाईल आहेत. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात हाच दर ७३.९० इतका आहे. एकूण देशाचा विचार करता, शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या ९१.९० इतकी आहे. 

शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या

राज्य                                       मोबाईलआंध्रप्रदेश                                ९५.३०आसाम                                    ६६.९०बिहार                                      ६०.८२गुजरात                                   ११२.३९हरयाणा                                  ९०.०२हिमाचल प्रदेश                       १४९.०९जम्मू काश्मीर                        ९९.२४कर्नाटका                                १११.८१केरळ                                     ११३.१४मध्यप्रदेश                             ६७.५३महाराष्ट्र                                ९४.१२उत्तर-पूर्व भारत                    ९१.३३ओडिसा                                ८०.४०पंजाब                                  ११८.२७राजस्थान                            ९०.२३तमिळनाडू                           १२६.६८उत्तरप्रदेश                          ७३.९०पश्चिम बंगाल                     ७३.३७कोलकाता                           १८४.३६दिल्ली                                २४६.१४मुंबई                                   १५४.६८—————————————----------एकूण                                  ९१.९०

कथा मोबाईलची अमेरिकेतील मार्टीन कुपर यांनी १९७३ साली प्रथम मोबाईलवरुन डॉ. जोएल एंगल यांना कॉल केला. त्यानंतर १९८० नंतर व्यावसायिक स्तरावर त्याची सुरुवात व्हायला लागली. देशात १९९५ साली तत्कालिन दूरसंचार मंत्री सुखराम यांनी पश्चिम बंगालचे तत्कालिन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला. त्यानंतर २००५ सालानंतर देशात मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.  

टॅग्स :MobileमोबाइलNew Delhiनवी दिल्लीAmericaअमेरिका