शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीवर ७० कोटींची पालिकेकडून मेहेरबानी

By admin | Updated: November 18, 2014 03:29 IST

पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरक व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तब्बल ७० कोटी निधी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याऐवजी वेळोवेळी आवश्यक निधी देऊन महापालिकेने पीएमपीच्या प्रशासनावर मेहेरबानी सुरू केल्याची चर्चा आहे. पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती. वेळेत थकबाकी दिली नाही, तर सीएनजी पुरवठा बंद करण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सीएनजी बिले व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. दरम्यान, पीएमपी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अनेक वर्षे दिलेली नाही. महापालिकेच्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्याच्या फरकासाठी २७ कोटींची तरतूद होती. उर्वरित २३ कोटी अखर्चिक रक्कम मिळून साधारणत: ५० कोटींची रक्कम देण्याच्या ठरावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी आज दिली. (प्रतिनिधी)